श्रीलंका महिला वि. बांग्लादेश महिला (Photo Credits: Twitter)

Sri Lanka Women National Cricket Team vs Bangladesh Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup Warm-up Matches, 2024 2nd Match: ICC महिला T20 विश्वचषक (ICC Women's T20 World Cup 2024) 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केला जात आहे. यावर्षी ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेचा हा नववा हंगाम 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दुबई आणि शारजाह येथे खेळवला जाईल. दरम्यान, आजपासून या स्पर्धेचे सराव सामने खेळवले जात आहेत. सरावाचा दुसरा सामना श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळला जात आहे. दरम्यान, दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  (हेही वाचा - Sri Lanka vs New Zealand, 2nd Test Day 3, Video Highlights: लंकन गोलंदाजानी गाजवला तिसरा दिवस; फॉलोअननंतर न्यूझीलंड 315 धावाने पिछाडीवर, पाहा सामन्याची हायलाइट्स एका क्लिकवर )

पाहा पोस्ट -

 

पाहा श्रीलंकेची प्लेइंग इलेवन - 

विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी (विकेटकिपर), निलाक्षी डी सिल्वा, चामारी अथापथु (कर्णधार), कविशा दिलहरी, अमा कांचना, इनोशी प्रियदर्शनी, अचिनी कुलसूरिया, सुगंधिका कुमारी, उदेशिका इंसाना प्रबोधिनी, निलाक्षी कुमारी, निलाक्षी राबोदनी, अमा कांचना. गिम्हणी

बांगलादेशची प्लेइंग इलेवन - 

मुर्शिदा खातून, शाठी रानी, ​​दिशा बिस्वास, शोभना मोस्तारी, शोरना अक्टर, निगार सुलताना (कर्णधार), दिलारा अक्टर, राबेया खान, रितू मोनी, फहिमा खातून, जहांआरा आलम, नाहिदा अक्टर, मारुफा अक्तर, सुलताना खातून, ताज नेहार