श्रीलंका क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

श्रीलंकेने भारताविरुद्ध (IND vs SL) 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 3 टी-20 (T-20) मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. 18 सदस्यीय संघाची कमान दसून शनाका (Dasun Shanaka) यांच्या हाती आहे. त्याचबरोबर चरित असलांकाची संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. फिटनेसच्या वादात अडकलेल्या पॉवर हिटर भानुका राजपक्षेला संघात स्थान मिळालेले नाही. या संघात IPL 2022 च्या लिलावात श्रीलंकेचा सर्वात महागडा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा देखील आहे. हसरंगाला विराट कोहलीच्या आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने लिलावात 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. हसरंगा व्यतिरिक्त, मिस्ट्री स्पिनर महिष तेक्षनाला देखील संधी मिळाली आहे, ज्याला सुपर किंग्जने आयपीएल लिलावात 70 लाख रुपयांना विकत घेतले होते. त्याचवेळी दुष्मंता चमीरा देखील या संघाचा एक भाग आहे. त्याला आयपीएल लिलावात लखनौ सुपर जायंट्स या नव्या संघाने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. म्हणजेच IPL 2022 च्या लिलावात विकल्या गेलेल्या 4 खेळाडूंना भारताविरुद्धच्या T20 मालिकेत स्थान देण्यात आले आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 टी-20 मालिकेनंतर आता 2 कसोटी मालिकाही होणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 24 फेब्रुवारीला लखनऊमध्ये होणार आहे. यानंतर उर्वरित दोन सामने 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी धर्मशाला येथे होणार आहेत. पहिली कसोटी 4 मार्चपासून मोहालीत आणि दुसरी कसोटी 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवली जाईल. (हे ही वाचा Ravi Shastri On Wriddhiman Saha: वृद्धिमान साहाला धमकी, संतापलेल्या रवी शास्त्रींनी बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांच्याकडे केली ही मागणी)

Tweet

भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेचं वेळापत्रक:

पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी, लखनऊ

दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी, धर्मशाला

तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी, धर्मशाला

श्रीलंकेचा टी-20 संघ:

दसुन शनका (कर्णधार), पथुम निसानका, कुसल मेन्डिस, चरित असलांका (उपकर्णधार), दिनेश चांदीमल, दनुष्का गुणथिलक, कामिल मिश्रा, जनिथ लियानागे, वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, शिरन फर्नांडो, महेश दीक्षाना, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, आशियान डेनियल.

भारताचा टी-20 संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिष्णोद, रवींद्र चहल यादव, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.