SRH vs RCB, IPL 2020: आयपीएल इतिहासात RCB ने मैदानात उतरवल्या सर्वाधिक वेळा-वेगळ्या जोड्या, आकडे पाहून डोळे चक्रावतील
देवदत्त पड्डीकल आणि आरोन फिंच (Photo Credit: Twitter/IPL)

आयपीएलच्या (IPL) 13व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे सुरु आहे. विराट कोहली बेंगलोरचे तर सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्त्व डेविड वॉर्नर करत आहे. टॉस जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने यंदा टीममध्ये नवीन खेळाडूंना संधी दिली आहे, त्यामुळे यंदा टीम कसे प्रदर्शन करते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. आरसीबीकडून आजच्या सामन्यात देवदत्त पड्डीकल (Devdutt Padikkal) आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) यांनी डावाची सुरुवात केली. दोघे फलंदाज मैदानावर उतरताच आरसीबीने एक नकोसा विक्रम नोंदवला. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा वेगळ्या जोड्या सलामीला (Most Opening Pair in IPL) खेळविण्याचा एकप्रकारे विक्रम नोंदवला. (SRH vs RCB, IPL 2020: 20-वर्षीय देवदत्त पड्डीकल, प्रियम गर्ग यांचे आयपीएल डेब्यू; जाणून घ्या भारताच्या युवा फलंदाजांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी)

आयपीएलचा 13 हंगामात मिळून आरसीबीने तब्बल 59 वेगळ्या जोड्या आजवर मैदानावर उतरवल्या आहेत. आरसीबीचे हे आकडे चक्रावणारे आहेत. आरसीबीनंतर मुंबई इंडियन्सकडून दुसऱ्या सर्वाधिक 47 वेगळ्या सलामी जोड्या खेळल्या आहेत. दरम्यान, आयपीएलचा पहिला सामना खेळणाऱ्या पड्डीकलने अर्धशतकी डाव खेळला आणि चौकार-षटकारांची बरसात केली. पड्डीकलने फिंचसोबत 90 धावांची भागीदारी केली आणि हैदराबादच्या गोलंदाजांना हैराण केले.

देवदत्तने 36 चेंडूत आयपीएलमधील आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यात 8 चौकारांचा समावेश आहे. कर्नाटकचा 20 वर्षीय युवा गोलंदाज देवदत्तने गेल्या एका वर्षात घरगुती क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने मागील वर्षी कर्नाटकला विजय हजारे ट्रॉफी जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. देवदत्तने केवळ 11 सामन्यांत 609 धावा केल्या ज्यामध्ये दोन शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये देखील कर्नाटक फलंदाजाने आपला फॉर्म कायम ठेवला आणि 12 सामन्यात एक शतक आणि पाच अर्धशतकात 548 धावा केल्या. दरम्यान, आरसीबीकडून केवळ देवदत्तनेच नाही ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जोश फिलिपी देखील पदार्पण करत आहे. हैदराबादकडून भारताचा अंडर-19 वर्ल्ड कप कर्णधार प्रियम गर्गने पदार्पण केले. प्रियम हैदराबादच्या मधल्याफळीची जबाबदारी सांभाळले.