चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 29व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ (Sunrisers Hyderabad Vs Chennai Super Kings) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी करत आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादच्या संघाचे कर्णधार पद ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वार्नर संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, आज 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

चेन्नई आणि हैदराबादच्या संघाला या हंगामात चांगले प्रदर्शन करता आले नाही. चेन्नई आणि बंगळरू या दोन्ही संघाला आपपल्या मागील सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. चेन्नईच्या संघाने या हंगामात 7 सामने खेळले असून केवळ दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, हैदराबादच्या संघाने 7 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे आजचा सामना चेन्नईच्या संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. हे देखील वाचा- IPL 2020: दस का दम! RCB विरुद्ध KKR सामन्यात शतकी भागीदारीने विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सने नोंदवला अनोखा विक्रम

संघ-

चेन्नई सुपर किंग्ज: शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), सॅम कुर्रान, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, दीपक चहर.

सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, केन विल्यमसन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, रशीद खान, संदीप शर्मा, खलील अहमद, टी नटराजन