SRH Vs CSK Dream11 Team Prediction IPL 2020: ड्रीम 11 गेममध्ये अधिक पॉईंट मिळवण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात 'या' खेळाडूंची करा निवड
SRH Vs CSK (Photo Credit: Twitter)

आयपीएलच्या तेराव्या हंगामात परतीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. या हंगामात सध्या मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अव्वल तर, दिल्ली कॅपिटल्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच या हंगामातील 29 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जचा (Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings) संघ एकमेकांशी भिडणार आहेत. आयपीएलच्या मागील अनेक हंगामात उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवणाऱ्या दोन्ही संघाला यंदा चांगली कामगिरी  करता आली नाही. यामुळे उद्याचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. सध्या अनेकांमध्ये ड्रीम 11 गेमचे वेड पाहायला मिळत आहे. परतु, या गेममध्ये चांगल्या खेळाडूंची निवड करता न आल्याने अनेकजण निराश झाले आहेत. यामुळे उद्याच्या सामन्यात कोणत्या खेळाडूंची निवड करणे योग्य ठरेल, यासाठी खालील माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेले इंडियन प्रीमिअर लीगचा तेरावा हंगाम यंदा यूएईत खेळवण्यात येत आहे. या हंगामात चेन्नई आणि हैदराबादच्या संघाने एकूण 7 सामने खेळले आहेत. यात हैदराबादच्या संघाने 3 विजय तर, 4 सामन्यात पराभवाचा सामना सामना केला आहे. तर, दुसरीकडे चेन्नईच्या संघाला केवळ 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे. हे देखील वाचा- IPL 2020: दस का दम! RCB विरुद्ध KKR सामन्यात शतकी भागीदारीने विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सने नोंदवला अनोखा विक्रम

या खेळाडूंची करा निवड-

यष्टीरक्षक: एमएस धोनी, जॉनी बेअरस्टो

फलंदाज: फाफ डु प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, प्रियांम गर्ग

अष्टपैलू: सॅम कुर्रान

गोलंदाज: शार्दुल ठाकूर, संदीप शर्मा, खलील अहमद, रशीद खान

संघ-

चेन्नई सुपर किंग्ज: शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), सॅम कुर्रान, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, दीपक चहर.

सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, केन विल्यमसन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, रशीद खान, संदीप शर्मा, खलील अहमद, टी नटराजन.