David Miller (Photo Credit: X)

South Africa vs Pakistan 1st T20 2024 Scorecard: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिला टी-20 सामना 10 डिसेंबर रोजी किंग्समीड, डर्बन येथे खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला. यासह यजमान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेकडून 40 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी केली. मिलरने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 8 षटकार मारले. याशिवाय जॉर्ज लिंडेने 24 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. (हे देखील वाचा: West Indies Beat Bangladesh 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 7 गडी राखून केला पराभव, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी)

येथे पाहा संपूर्ण स्कोरकार्ड

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 9 गडी गमावून 183 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी मिलरने 40 चेंडूत सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. याशिवाय जॉर्ज लिंडेने 24 चेंडूत 48 धावा, हेनरिक क्लासेनने 12 धावा, रीझा हेंड्रिक्सने 8 धावा, डोनोवन फरेराने 7 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. याशिवाय अब्बास आफ्रिदीला 2 आणि सुफियान मुकीमला एक विकेट मिळाली.

बाबर आझम खाते न उघडताच बाद

184 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ 8 विकेट गमावून केवळ 172 धावा करू शकला. पाकिस्तानकडून कर्णधार मोहम्मद रिझवानने 62 चेंडूत सर्वाधिक 72 धावा केल्या. रिझवानशिवाय सैम अयुबने 15 चेंडूत 31 आणि तय्यब ताहिरने 18 धावा केल्या. तर बाबर आझम खाते न उघडताच बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून जॉर्ज लिंडेने शानदार गोलंदाजी केली. जॉर्ज लिंडेने 4 षटकात 21 धावा देत 4 बळी घेतले. तर क्वेना माफाकाने 2, ओटोनिल बार्टमनने 1 बळी आणि अँडिले सिमेलेने 1 गडी बाद केला.