PAK vs SA (Photo Credit - X)

South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 1st ODI 2024 Live Streaming: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (PAK vs SA 1st ODI 2024) आज म्हणजेच 17 डिसेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधला हा सामना पार्लच्या बोलंड पार्कवर होणार आहे. उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा एकदिवसीय मालिकेकडे लागल्या आहेत. वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर असेल. दुसरीकडे, पाकिस्तानचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे असेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

PAK vs SA यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना किती वाजता होणार सुरु 

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवार 17 डिसेंबर रोजी पार्ल येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता खेळवला जाईल. (हे देखील वाचा: PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून)

PAK vs SA यांच्यातील पहिला एकदिवसीय सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहणार?

आम्ही तुम्हाला सांगतो की दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान एकदिवसीय मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 एसडी आणि स्पोर्ट्स 18-1 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून पहिल्या वनडे सामन्याचा आनंद घेता येईल.

PAK vs SA दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका: टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (सी), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, कागिसो रबाडा, ओटनील बार्टमन.

पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, सईम अयुब, बाबर आझम, तय्यब ताहिर, सलमान आगा, मोहम्मद रिझवान (कर्णधार), शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, अबरार अहमद.