South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team, 3rd T20I Live Toss Update: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता उभय संघांमधला तिसरा टी-20 सामना आज म्हणजेच बुधवारी, 13 नोव्हेंबर रोजी सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन कसे असू शकतात ते येथे जाणून घ्या. पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने 61 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय संघ प्रथम खेळून केवळ 124 धावा करू शकला. मात्र, एके काळी सामना टीम इंडियाच्या हातात होता, मात्र सात विकेट्स बाद झाल्यानंतर ट्रस्टन स्टब्स आणि गेराल्ड कोएत्झी यांनी आपला संघ गमावलेला सामना जिंकून दिला. (हेही वाचा - IND vs SA, 3rd T20I Match Key Players To Watch Out: दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मालिकेत पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, सर्वांच्या नजरा या असणार दिग्गज खेळाडूंवर)
पाहा पोस्ट -
3rd T20I.South Africa Won the toss and elected to field . https://t.co/id6j7RV9wp #SAvIND
— BCCI (@BCCI) November 13, 2024
टीम इंडियाने या सामन्यात एक बदल केला आहे. या सामन्यात भारतीय संघात रमनदिप सिंगचा समावेश करण्यात आला असून आवेश खानला आज संघातून वगळण्यात आले आहे. साउथ आफ्रिकेने मात्र संघात कोणताच बदल केला नाही.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॉन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.
टीम इंडिया : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, रमनदिप सिंग.