![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/sa1.jpg?width=380&height=214)
New Zealand National Cricket Team vs South Africa National Cricket Team 2nd ODI Match 2025 Scorecard: लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (New Zealand vs South Africa) यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 6 गडी गमावून 304 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी मॅथ्यू ब्रिट्झकेने पदार्पणाच्या सामन्यात शानदार शतक झळकावले. मॅथ्यू ब्रिट्झकेने 148 चेंडूत 150 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 11 चौकार आणि 5 षटकार मारले. याशिवाय, विआन मुल्डरनेही 60 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 64 धावा केल्या. येथे पहा स्कोअरकार्ड
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारशी खास नव्हती. दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच धक्का बसला कारण कर्णधार टेम्बा बावुमाने 37 धावांवर आपली विकेट गमावली. यानंतर, मॅथ्यू ब्रिट्झके आणि जेसन स्मिथ यांच्यात मोठी भागीदारी झाली आणि संघाचा धावसंख्या 100 धावांपर्यंत पोहोचली. दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का 130 धावांवर बसला. जेव्हा जेसन स्मिथ 41 धावांवर धावचीत झाला. दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू ब्रीट्झकेने सर्वाधिक 150 धावा केल्या. याशिवाय, विआन मुल्डरने 4 धावा आणि कर्णधार टेम्बा बावुमाने 20 धावांचे योगदान दिले.
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला दिले 305 धावांचे लक्ष्य
न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि विल्यम ओ'रोर्क यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर मायकेल ब्रेसवेलने 1 विकेट घेतली. सध्या, तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी न्यूझीलंडला हा सामना जिंकावाच लागेल. किवी संघाला 305 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. दुसरीकडे, हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला चांगली गोलंदाजी करावी लागेल.