
England National Cricket Team vs South Africa National Cricket Team, 1st ODI Match 2025 Scorecard Update: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेतील पहिला सामना मंगळवारी, 2 सप्टेंबर रोजी लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव करत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिका मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंड कमबॅक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व हॅरी ब्रूक करत आहे, तर टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कमान सांभाळत आहेत.
दक्षिण आफ्रिकेची अचूक गोलंदाजी
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार टेम्बा बावुमाचा निर्णय अचूक ठरला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. 44 धावांवरच इंग्लंडचे दोन फलंदाज माघारी परतले. त्यानंतर जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूकने डाव सांभाळला आणि संघाची धावसंख्या 82 पर्यंत नेली.
A thrashing in Leeds - South Africa start the ODI series in style!
Scorecard: https://t.co/9XjB1BHcvw pic.twitter.com/D2qVh1V7zv
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 2, 2025
इंग्लंडचा संपूर्ण संघ 24.3 षटकांत केवळ 131 धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून सलामीवीर जेमी स्मिथने सर्वाधिक 54 धावांची शानदार खेळी केली. 48 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या मदतीने त्याने ही दमदार खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त जोस बटलरने 15 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीमध्ये केशव महाराजने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर वियान मुल्डरने 3 महत्त्वाचे बळी मिळवत इंग्लंडच्या फलंदाजीची कंबर मोडली.
मार्करामची वादळी खेळी
132 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 121 धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेने केवळ 20.5 षटकांत 3 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. सलामीवीर एडेन मार्करामने केवळ 55 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांसह 86 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्याशिवाय रायन रिकेल्टनने नाबाद 31 धावांचे योगदान दिले.
इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक 3 बळी घेतले. दुसऱ्या वनडे सामन्यासाठी दोन्ही संघ आता लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर 4 सप्टेंबर रोजी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल.