भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Gangully) यांची बीसीसीआयचे (BCCI) नवे अध्यक्ष म्हणून अधिकृतरीत्या निवड झाली आहे. आज मुंबई येथे त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोन नावांमध्ये चुरस होती. अखेर सौरव गांगुली यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा 33 महिन्यांचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे आजच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली व त्यांनी आजच पदाची सूत्रे हाती घेतली.
It's official - @SGanguly99 formally elected as the President of BCCI pic.twitter.com/Ln1VkCTyIW
— BCCI (@BCCI) October 23, 2019
सौरव गांगुली यांच्यासोबत अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांची बीसीसीआयचे सचिव आणि अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांची बीसीसीआयचे कोषाध्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली आज बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. आजच्या निवडीनंतर सौरव गांगुली हा बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष ठरला आहे.
(हेही वाचा: BCCI अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुली याने माजी हरभजन सिंह याची मागितली मदत, हे आहे कारण)
सौरव गांगुलीने 14 ऑक्टोबर रोजी बीसीसीआय अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्या दरम्यान इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नसल्याने गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.