युवराज सिंह, सौरव गांगुली (Photo Credit: Facebook)

भारतीय क्रिकेट मंडळ, बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष बनणारे टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि क्रिकेट बंगालचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत. माजी सहकारी सचिन तेंडुलकर याच्यापासून वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीस लक्ष्मण पर्यंत सर्वांनी गांगुलीचे अभिनंदन केले आहेत. आणि त्याच्यापासून खूप मोठ्या गोष्टींची अपेक्षा आहे असेदेखील म्हटले आहे. गांगुलीचे अभिनंद करणार्‍यांमध्ये माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंह (Yuvraj Singh) याचाही समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डचा अध्यक्ष बनण्यापासून ते भारतीय क्रिकेट संघाचे सर्वात महान कर्णधार अशी गांगुलीची ओळख आहे. गांगुलीचे अभिनंदन करताना युवीने बीसीसीआयवर टीका केली, ज्याला गांगुलीने नम्रपणे उत्तर दिले. (BCCI अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुली याने माजी हरभजन सिंह याची मागितली मदत, हे आहे कारण)

युवराजने त्याचे अभिनंदन केले आहे आणि खेळाडूंच्या दृष्टीकोनातून इतर प्रशासकीय अधिकारीही परिस्थिती समजून घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्षपदासाठी एकटाच अर्ज दाखल केला होता आणि ते 23 ऑक्टोबरपासून पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. युवराजने लिहिले की, 'भारतीय कर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष ते महान माणूस असा सर्वात मोठा प्रवास. माझा असा विश्वास आहे की एखाद्या क्रिकेटरने प्रशासक होणे खूप चांगले आहे कारण यामध्ये आपणास परिस्थितीनुसार खेळाडूंच्या दृष्टिकोनातून समजते. यो-यो टेस्ट असताना आपण अध्यक्ष होता अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला 'दादी' हार्दिक शुभेच्छा." युवीच्या या ट्विटला गांगुलीने नम्रपणे उत्तर देत लिहिले की, "आभारी आहे, तुम्ही भारतासाठी विश्वचषक जिंकला आहे, आता खेळासाठी काहीतरी चांगले करण्याची वेळ आली आहे ... तुम्ही आमचे सुपरस्टार आहात ... देव तुम्हाला आशीर्वाद दे."

युवराजच्या या ट्विटचा इशारा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या शेवटच्या दिवसांकडे होता. टीम इंडियामध्ये स्थान मिळविण्यासाठी यो-यो टेस्ट अनिवार्य करण्यात आले होते. 2007 चा पहिल्या टी-20 विश्वचषक आणि 2011 मधील भारताचा वनडे विश्वचषक जिंकण्यात युवराजची महत्त्वाची भूमिका होती. दरम्यान, गांगुली फक्त 10 महिन्यांसाठी बीसीसीआय अध्यक्ष होणार आहेत.