एमएस धोनी (MS Dhoni) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यात तुलना करणे कठीण असल्याचे मतभारताचे माजी कर्णधार क्रिस श्रीकांत (Kris Srikkanth) यांनी मांडले. पण श्रीकांतने अलीकडेच मत व्यक्त केले की गांगुलीने मजबूत भारतीय संघाचा (Indian Team) पाया रचला आणि धोनीला ताटात विजयी संयोजन मिळाले. भारतीय क्रिकेट संघातील दृष्टीकोन व संपूर्ण मानसिकतेत कायापालट करण्यास दादा जबाबदार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मागील काही दिवसांपासून भारतीय संघाचा सर्वात चांगला कर्णधार गांगुली की धोनी यावर चर्चा सुरु आहे. अनेकजणांनी यावर आपली मतं मांडली आहेत. काही जणांच्या मते धोनी हा भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे तर काहींच्या मते गांगुलीने खरा आक्रमक भारतीय संघ तयार केला. ('फक्त ग्रेग चॅपेलला दोष देऊ शकत नाही', 15 वर्षानंतर सौरव गांगुली यांनी भारतीय संघातून वगळण्याबाबत केला धक्कादायक खुलासा)
स्टार स्पोर्ट्स शो क्रिकेट कनेक्टेडच्या ताज्या आवृत्तीत गौतम गंभीर, इरफान पठाण आणि कुमार संगकारासह श्रीकांत यांनी भारतीय संघात घडलेल्या परिवर्तनाबद्दल आणि गांगुली व धोनीच्या वारसाविषयी आपले मत मांडले. श्रीकांत यांनी नमूद केले की सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेट संघाच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणण्यास जबाबदार आहेत. "अत्यंत महत्त्वपूर्ण वेळी त्याने कर्णधारपदाचा कार्यभार स्वीकारला. तो परिवर्तनाची प्रक्रिया सुरू करणारा खेळाडू होता. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा दृष्टीकोन आणि संपूर्ण मानसिकतेत परिवर्तन केले." ते म्हणाले की, बीसीसीआयच्या विद्यमान अध्यक्षांनी भारतीय संघ घडवला, धोनीला गांगुलीमुळे विजयी फॉर्म्युला आयता मिळाला.
"सौरव गांगुलीने नवीन संघ स्थापन केला आणि एमएस धोनीला एका ताटात विजयी फॉर्म्युला आयता मिळाला." दुसरीकडे, श्रीकांतने धोनीला महान सौरव गांगुलीपेक्षा कसोटी कर्णधार म्हणून स्थान दिले आहे. 2001 ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मालिकेत गांगुलीच्या जादुई कर्णधारपदाची श्रीकांत यांनी प्रशंसा केली. गांगुलीप्रमाणे धोनीकडे अनिल कुंबळे आणि हरभजन सिंहला आपल्या संघात घेण्याची लक्झरी नव्हती असेही भारताच्या माजी कर्णधाराने नमूद केले.