IND vs AUS 2020-21 Series: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेविड वॉर्नरचे (David Warner) चाहते जगभरात उपस्थित आहेत पण त्याच्या मुलीचा आवडता खेळाडू तो नाही तर टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आहे. वॉर्नरची गणना जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जाते. जगातील अनेक दिग्गजांनी त्याला कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 चा पूर्ण खेळाडू मानले आहे. आयपीएलचे माजी चॅम्पियन सनरायझर्स हैदराबादची कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतलेल्या वॉर्नरची पत्नी कँडिस (Candice Warner) यांनी ‘सॉरी’ लिहीत एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि तिने पती डेविड वॉर्नरलाही टॅग केले. ऑस्ट्रेलियाच्या 'ट्रिपल एम सिडनी 104.9' रेडिओ चॅनलवरील शो दरम्यान जेव्हा होस्टने त्याला आवडत्या क्रिकेटपटूबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली की त्यांच्या दुसऱ्या मुलगी विराट कोहलीला खूप आवडतो. 33 वर्षीय वॉर्नरला तीन मुली (David Warner Daughters) आहेत. त्यांची मोठी मुलगी, Ivy Mae 6 वर्षांची आहे, दुसरी मुलगी Indi-Rae 4 वर्षाची आणि तिसरी मुलगी Isla Rose 1 वर्षाची आहे. (IND vs AUS 2020-21: ‘विराट कोहलीचा द्वेष करायला आवडतं, पण फॅन म्हणून त्याची फलंदाजी आवडते’, ऑस्ट्रेलियाई कर्णधार टिम पेनचे विधान)
दरम्यान, मुलाखतीत वॉर्नरच्या पत्नीने हे देखील उघड केले की मुली क्रीसवर असताना ऑस्ट्रेलियन फलंदाज बाउन्सर गोलंदाजी करतो किंवा चेंडू स्पिन करतो. तिने हे देखील म्हटले की त्यांच्या घरामागील अंगणातील क्रिकेट स्पर्धात्मक भावनेने खेळले जाते ज्यामध्ये स्लेजिंग देखील केले जाते. “हो, आम्ही कधीकधी बॅकयार्ड क्रिकेट खेळतो. पण माझ्या मुलींसोबत एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की कधीकधी त्यांना बाबा व्हायचे असतात, कधीकधी त्यांना फिंची व्हायचे असते परंतु माझ्या मधल्या मुलीला विराट कोहली व्हायचे आहे. तिचा आवडता खेळाडू विराट कोहली आहे,” ती म्हणाली. पाहा व्हिडिओ:
Sorry @davidwarner31. 🤣❤️ https://t.co/dDqPF51vJu
— Candice Warner (@CandiceWarner31) November 18, 2020
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी मालिकेसाठी क्रिकेटींग स्पेक्ट्रम उत्सुकतेने वाट पाहत आहे. जेव्हा भारतीय संघाने अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा केला तेव्हा विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मालिका विजय नोंदविणारा पहिला आशियाई कर्णधार म्हणून इतिहास रचला होता. गेल्या वेळी दोन्ही संघांमध्ये मैदानात भरपूर मैदानावर वाद निर्माण झाला होता आणि ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार टिम पेनने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स कोहलीबद्दल काय मत व्यक्त केले याबद्दल उघड केले. "मला त्याच्याविषयी बरेच प्रश्न विचारले जातात, तो माझ्यासाठी फक्त दुसऱ्या खेळाडूसारखा आहे, यामुळे तो मला खरोखर त्रास देत नाही. खरं म्हणजे त्याच्याबरोबर नातं असण्याचा काही संबंध नाही, मी टॉसमध्ये त्याला पाहतो आणि त्याच्याविरुद्ध खेळतो आणि इतकाच," पेनने ABC Sportला सांगितले.