Super Smash 2021: न्यूझीलंडची ही मुलगी आहे कमाल, जडले शाहिद आफ्रिदीपेक्षाही वेगवान शतक, शॉट पाहून तुम्हीही म्हणाल  वाह

न्यूझीलंड महिला संघाची कर्णधार सोफी डिवाईनने बुधवारी न्यूझीलंडच्या स्थानिक टी-20 सुपर स्मॅशमध्ये ओटागो स्पार्क्सविरुद्ध वेलिंग्टन ब्लेझसाठी 36 चेंडूत शतक झळकावले आणि संघाला सर्वात मोठा विजय मिळवून दिला. महिला टी-20 क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान शतक ठरले. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 38 चेंडूत शतकी खेळी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या डेंड्रा डॉटिनचा मागील विक्रम मोडला.

क्रिकेट टीम लेटेस्टली|
Super Smash 2021: न्यूझीलंडची ही मुलगी आहे कमाल, जडले शाहिद आफ्रिदीपेक्षाही वेगवान शतक, शॉट पाहून तुम्हीही म्हणाल  वाह
सोफी डिवाइन (Photo Credit: Twitter/ICC)

Super Smash 2021: न्यूझीलंड महिला संघाची कर्णधार सोफी डिवाईनने (Sophie Devine) बुधवारी न्यूझीलंडच्या (New Zealand) स्थानिक टी-20 सुपर स्मॅशमध्ये (Super Smash) ओटागो स्पार्क्सविरुद्ध (Otago Sparks) वेलिंग्टन ब्लेझसाठी (Wellington Blazer's) 36 चेंडूत शतक झळकावले आणि संघाला सर्वात मोठा विजय मिळवून दिला. महिला टी-20 क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान शतक ठरले. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 38 चेंडूत शतकी खेळी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या डेंड्रा डॉटिनचा (Deandra Dottin) मागील विक्रम मोडला. वेस्ट इंडिजच्या डॉटिनने टी-20 मधील पहिले शतक झळकावले होते. इतकंच नाही तर सोफीची नाबाद शतकी खाली खेळी न्यूझीलंडमधील सर्वात वेगवान टी-20 ठरले. यापूर्वी, 2017 टिम सेफर्टने (Tim Seifer) माउंट मॉन्गुनुई येथे नॉर्दन डिस्ट्रिक्टससाठी 40 चेंडूत शंभरी गाठली होती. 2018 मध्ये नॉर्थॅम्प्टनशायरविरुद्ध वॉर्सेस्टरशायरसाठी मार्टिन गप्टिलच्या 35 चेंडूत आणि ग्लॉस्टरशायरविरुद्ध ससेक्ससाठी 2012 मध्ये स्कॉट स्टायरिसच्या 37 चेंडूत शतकी खेळीनंतर न्यूझीलंड फलंदाजाने झळकावलेले तिसरे वेगवान टी-20 शतक आहे. सोफीच्या चमकदार खेळीने वेलिंग्टनचा 9व्या ओव्हरमध्ये 10 गडी राखून विजय निश्चित झाला. त्यापूर्वी स्पार्क्सने केवळ 128/7 धावसंख्या उभारली होती. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत विश्वविक्रम; क्रिकेटपटू पुनीत बिष्ट याने 51 चेंडूत नाबाद ठोकल्या 146 धावा)

न्यूझीलंड कर्णधाराने केवळ 38 चेंडूंत नाबाद 108 धावांची खेळी करत नऊ षटकार आणि नऊ चौकार ठोकले. नोव्हेंबर अखेरीस महिला बिग बॅश लीगच्या समाप्तीनंतर कोणत्याही स्वरूपात डिवाइनचा हा पहिला गेम होता आणि गेल्या वर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात मुक्काम वाढवल्यामुळे तिला रविवारी 14 दिवसांच्या क्वारंटाइननंतर रिलीज करण्यात आले होते. लक्षात घेण्यासारखे म्हणजे डिवाइनने  षटकार सामना पाहण्यासाठी आलेल्या एका लहान मुलीला लागला आणि मॅच संपल्यावर किवी खेळाडूने तिची भेट घेत चौकशी केली. सोफीने तिच्याबाबरोबर फोटो देखील क्लिक केले. "आज सकाळी मी खरोखरच अस्वस्थ होते ," डिवाइन सामन्यानंतर म्हणाली. "जेव्हा आपण गेमपासून थोडा विस्तारित ब्रेक घेता तेव्हा आपण त्यात परत येऊ शकता याबद्दल आपण घाबरून जातात. म्हणून खेळपट्टीवर थोडा वेळ घालवणे आणि स्क्रूमधून बाहेर पडणे (छान) होते," सोफीने पुढे म्हटले.

डिवाईनने घेतली युवा चाहत्याची भेट

पुरुष आणि महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शंभरी आकडा गाठण्याचा रेकॉर्ड वेस्ट इंडिज फलंदाज आणि 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 2013 आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 30 चेंडूंचे शतक ठोकले होते. क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमधील गेलचा रेकॉर्ड अद्याप कोणालाही मोडता आलेला नाही.

/sophie-devine-smashes-fastest-t20-century-in-history-during-new-zealand-super-smash-tournament-watch-her-record-break-inning-video-213432.html');return false;" href="https://facebook.com/sharer.php?u=https://marathi.latestly.com/sports/cricket/sophie-devine-smashes-fastest-t20-century-in-history-during-new-zealand-super-smash-tournament-watch-her-record-break-inning-video-213432.html" title="Share on Facebook">
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change