Women T20 Challenge Final: महिला टी-20 चॅलेंजच्या अंतिम सामन्यात दोन वेळच्या चॅम्पियन सुपरनोवाची (Supernovas) लढत वेलोसिटीशी (Velocity) शनिवार, 28 मे रोजी होणार आहे. दोन्ही संघ जेतेपदाकडे डोळे लावून बसतील, परंतु महिलांच्या टी-20 चॅलेंजमध्ये त्यांचे पहिले विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात वेलोसिटी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वेलोसिटीचा संघ एकदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे तर हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील सुपरनोवा संघाने दोनदा ट्रॉफी जिंकली आहे. 2018 मध्ये त्याने ट्रेलब्लेझर्स (Trailblazers) आणि 2019 मध्ये वेलोसिटीचा पराभव करत जेतेपद पटकावले होते. सुपरनोवाला लीग स्टेजमध्ये वेलोसिटीने पराभूत केले होते, त्यामुळे बदला घेणे आणि तिसर्या विजेतेपद जिंकण्याकडे हरमनप्रीतच्या संघाचे लक्ष असेल. अशा परिस्थितीत जेतेपदाची सामन्यात दोन्ही संघाच्या या तडाखेबाज खेळाडूंवर नजर असेल. (Women's T20 Challenge: 16 धावांनी पराभूत होऊनही Velocity फायनलसाठी पात्र, ट्रेलब्लेझर्सची विजयासह मोहीम संपुष्टात; किरण नवगिरेने ठोकले जलद अर्धशतक)
दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखालील वेलोसिटीचा संघ येथे विजय नोंदवून प्रथमच या ट्रॉफीवर कब्जा करू इच्छित असेल. वेलोसिटी संघाचे गुण ट्रेलब्लेझर्सच्या बरोबरीचे होते परंतु नेट रनरेटच्या आधारावर अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरले. सामना जिंकूनही ट्रेलब्लेझर्सनी त्यांच्या नेट रनरेटमुळे स्पर्धे बाहेर पडले. दरम्यान महिला टी-20 चॅलेंजचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. कारण पुढील वर्षीपासून महिला आयपीएल आयोजित बीसीसीआयची योजना आहे.
पूजा वस्त्ररकर
ट्रेलब्लेझर्सविरुद्ध पूजाने 12 धावांत 4 विकेट घेतल्या. ही धडाकेबाज गोलंदाज सध्या उत्कृष्ट लयीत आहे आणि सुपरनोवाची मुख्य गोलंदाज असेल.
हरमनप्रीत कौर
सुपरनोवा कर्णधाराने शेवटच्या सामन्यात 71 धावा केल्या आणि जेव्हा तिचा संघाची नजर तिसऱ्या विजेतेपदावर असताना तिने पुन्हा आपल्या जुन्या रंगात फलंदाजी करणे अपेक्षित आहे.
शेफाली वर्मा
लीग सामन्यात सुपरनोवाविरुद्ध शेफालीने 33 चेंडूंत 51 धावा केल्या आणि वेलोसिटी संघाने यशस्वीपणे 151 धावांचा पाठलाग केला आणि प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळवला.
लॉरा वोल्वार्ड
सुपरनोवाविरुद्ध त्याच सामन्यात शेफालीनंतर लॉराने मधल्या फळीत नाबाद 51 धावा करत वेलोसिटीच्या झोळीत विजय पाडला होता. दक्षिण आफ्रिकेची स्टार फलंदाज विश्वचषकपासून धावांचा डोंगर उभारत आहे. आणि वेलोसिटीला पहिले जेतेपद मिळवून तिची मधल्या फळीत निर्णायक भूमिका असेल.