WPL लिलावात Smriti Mandhana ठरली सर्वात महागडी क्रिकेटर, लिलावानंततर असे दिसत आहे पाच संघ
WPL Auction (Photo Credit - File)

WPL Auction 2023 Full Team Details: महिला क्रिकेटसाठी (Women's Cricket) आजची तारीख ऐतिहासिक ठरली. महिला प्रीमियर लीगच्या (Women's Premier League) पहिल्या सत्रासाठी आज लिलाव पार पडला. यामध्ये एकूण 5 संघांनी 87 खेळाडूंवर बोली लावली आणि यासाठी सुमारे 59.50 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या लिलावात भारतीय खेळाडूंसोबतच 30 विदेशी खेळाडूंनाही खरेदी करण्यात आले. लिलावात स्मृती मानधना ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. स्मृती मंधानाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले. स्मृती मानधनासह (Smriti Mandhana) तीन खेळाडूंना तीन कोटींहून अधिक रुपयांना खरेदी करण्यात आले. ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅशले गार्डनरला गुजरात जायंट्सने 3.20 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले होते. नताली सायव्हरलाही 3.20 कोटी रुपयांना विकत घेतले.

टीम इंडियाची अनुभवी अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माचे नावही महागड्या खेळाडूंच्या यादीत सामील आहे. दीप्तीला लिलावात 2.60 कोटी रुपये मिळाले. जेमिमा रॉड्रिग्जवरही चांगलीच किंमत लादण्यात आली. तिला दिल्ली कॅपिटल्सने 2.20 कोटी रुपयांना विकत घेतले. बेथ मुनीला गुजरात जायंट्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. शेफाली वर्माला दिल्लीने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. (हे देखील वाचा: WPL 2023 Auction: आरसीबीने स्मृती मंधानाला 3.40 कोटींमध्ये केले खरेदी, भारतीय संघाच्या खेळाडूंनी केला एकच जल्लोष; पहा व्हिडिओ)

लिलावानंततर असे दिसत आहे पाच संघ

आरसीबी: स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन (NZ), एलिस पेरी (AUS), रेणुका ठाकूर, रिचा घोष, एरिन बर्न्स (AUS), दिशा कसाट, इंद्राणी रॉय, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, आशा शोभना, हीदर नाइट (ENG), डॅन व्हॅन निकेर्क (SA), प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांज, मेगन शुट (AUS) आणि सहाना पवार.

मुंबई इंडियन्स: हरमनप्रीत कौर, नताली सिव्हर-ब्रंट (ENG), अमेलिया कार (NZ), पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम (AUS), इसी वोंग (ENG), अमनजोत कौर, धर गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतामणी कालिका आणि नीलम बिश्त.

दिल्ली कॅपिटल्स: जेमिमाह रॉड्रिग्स, मेग लॅनिंग (AUS), शफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिझान कॅप (SA), तीतास साधू, अॅलिस कॅप्सी (ENG), तारा नॉरिस (US), लॉरा किमिन्स (AUS), जेसिया अख्तर, मिन्नू मणी, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जॉन्सन (AUS), स्नेहा दीप्ती, अरुंधती रेड्डी आणि अपर्णा मंडल.

गुजरात जायंट्स: अॅशले गार्डनर (AUS), बेथ मूनी (AUS), सोफिया डंकले (ENG), अॅनाबेल सदरलँड (AUS), हरलीन देओल, डायंड्रा डॉटिन (WES), स्नेह राणा, एस मेघना, जॉर्जिया वेरेहम (AUS), मानसी जोशी , दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया आणि शबनम शकील.

यूपी वॉरियर्स: सोफी एक्लेस्टन (ENG), दीप्ती शर्मा, तालिया मॅकग्रा (AUS), शबनीम इस्माईल (SA), अलिसा हिली (AUS), अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, पार्श्वी चोप्रा, श्वेता सेहरावत, एस यशश्री, जी किरण नवगरे, जी. हॅरिस (AUS), देविका वैद्य, लॉरेन बेल (ENG), लक्ष्मी यादव आणि सिमरन शेख.