SL vs IND 1st ODI 2021: शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघातील 'हे' 11 खेळाडू श्रीलंकेशी भिडण्याची शक्यता, पाहा संपूर्ण यादी
शिखर धवन (Photo Credit: PTI)

SL vs IND 1st ODI 2021: भारत आणि श्रीलंका दरम्यान पहिला एकदिवसीय सामना उद्या रविवारी (18 जुलै) कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या दौर्‍यावर धवन नवीन इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. तो प्रथमच भारतीय संघाचे कर्णधारपदाची जबाबदारी घेणार आहे. भारतीय क्रिकेट चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या रोमांचक सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. तसेच या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्ह अॅपवर पाहता येणार आहे.

श्रीलंका विरुद्ध खेळले जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून कोणते खेळाडू मैदानात उतरले जाणार? याचीही अनेकांना उस्तुकता लागली आहे. याचपार्श्वभूमीवर शिखर धवनच्या नेतृत्वात पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांचा संघात समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- IND vs SL 2021: श्रीलंका वनडेपूर्वी दमशेराजमध्ये युजवेंद्र चहल-कुलुदीप यादव यांची धमाल, BCCI ने शेअर केलेला पाहा हा मजेदार व्हिडिओ

या संघानुसार, भारतीय संघाकडून कर्णधार शिखर धवन आणि युवा खेळाडू पृथ्वी शॉ सामन्याची सुरुवात करू शकतात. या दोघांना आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा अनुभव आहे. तसेच आयपीएलमध्ये या दोघांची जोडी चांगली कामगिरी बजावली होती. त्यानंतर मध्यक्रमात सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, मनीष पांडे चांगली खेळी करण्याची शक्यता आहे.

त्यानंतर गोलंदाजीबाबत बोलायचे झाले तर, पहिल्या एकदिवसीय सामन्यात उपकर्णधार भुवनेश्वर कुमारसह दीपक चाहर आणि नवदीप सैनी या युवा गोलंदाजांना संधी मिळू शकते. तर, फिरकीपटू युजवेंद्र चहलचे नाव निश्चित झाल्यात जमा आहे.