विश्वचषक आपला पराभव मागे सोडत श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेट संघाने प्रभावी खेळी करत बांग्लादेश (Bangladesh) संघाचा 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत बांगला टायगर्सचा धुव्वा उडवला. बुधवारी खेळण्यात आलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात एंजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) आणि कुसल मेंडिस (Kusal Mendis) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत 294 धावा केल्या. मेंडिस आणि मॅथ्यूजने 101 धावांची भागीदारी केली. मॅथ्यूजने 87 तर मेंडिसने 54 धावा केल्या. पण सोशल मीडियावर श्रीलंकेच्या विजयापेक्षा त्यांच्या सामना जिंकण्यानंतरचा एक व्हिडिओ ट्रेंड होत आहे.
श्रीलंकाने अंतिम वनडेमध्ये बांग्लादेशला 295 धावांचे लक्ष दिले होते. पण बांग्लादेश संघाला विजयासाठी 122 कमी पडल्या. परिणामी श्रीलंकाने त्यांचा तिसऱ्या ओणेड्यामध्ये पराभव करत तीन सामन्याच्या मालिकेत क्लिन स्वीप केला. दरम्यान, सामन्यानंतर कुसल मेंडिस याचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये मेंडिस सामना जिंकल्यानंतर सामनावीरचा पुरस्कार मॅथ्यूजला मिळालेली बाईक चालवत असल्याचे दिसत आहे. मालिकेचा आनंद साजरा करताना मेंडिसने दुचाकी चालवली पण ती बाईक मैदानावरच घसरली. आयलँड क्रिकेटने या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात मंदीस बाईक चालवण्यात अपयशी झालेला दिसतोय. आणि काही वेळाने तो आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्ती मैदानावर आदळताण दिसतेय. पहा हा रोचक व्हिडिओ:
— Island Cricket (@IslandCricket) August 1, 2019
दरम्यान, श्रीलंकाने बांग्लादेश विरुद्ध तिसरा वनडे सामना नुवान कुलसेकरा याला समर्पित केला. कुलसेकरने बांग्लादेश मालिकाआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. कुलसेकराला सामना पाहण्यासाठी कोलंबोमध्ये आमंत्रित केले होते. आणि श्रीलंका क्रिकेटसाठी त्याच्या योगदानाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.