Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल 2025 (IPL 2025) नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरातला चांगली सुरुवात करून दिली आहे. या सामन्यात गिलने एक मोठा टप्पा गाठला आणि डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला. एका बाबतीत मोठी कामगिरी करणारा तो ख्रिस गेलनंतर जगातील दुसरा खेळाडू बनला आहे.
गिलने आयपीएलमध्ये सर्वात जलद 1000 धावा केल्या पूर्ण
मुंबई इंडियन्सविरुद्ध सलामीवीर शुभमन गिलने शानदार कामगिरी केली. या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी केली आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. खरं तर, गिल हा ख्रिस गेलनंतर एकाच ठिकाणी आयपीएलमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा खेळाडू बनला आहे. गिलने केवळ 20 डावांमध्ये ही कामगिरी केली. (हे देखील वाचा: GT vs MI, IPL 2025 9th Match Live Scorecard: गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर पाहा लाईव्ह स्कोरकार्ड)
ख्रिस गेल पहिल्या स्थानावर
आयपीएलमध्ये एकाच ठिकाणी सर्वात जलद वेळेत 1000 धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 19 डावांमध्ये बंगळुरूच्या मैदानावर सर्वात जलद 1000 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने हैदराबादच्या मैदानावर 22 डावांमध्ये एक मोठी कामगिरी केली. चौथ्या क्रमांकावर शॉन मार्श आहे, ज्याने मोहालीच्या मैदानावर 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 26 डाव घेतले.
एकाच ठिकाणी 1000 आयपीएल धावा पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी डाव
19 – ख्रिस गेल, बंगळुरू
20 – शुभमन गिल, अहमदाबाद*
22 - डेव्हिड वॉर्नर, हैदराबाद
26 – शॉन मार्श, मोहाली
गिलची शानदार खेळी
या सामन्यात गिलने साई सुदर्शनसोबत पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. 8.3 षटकात हार्दिक पांड्याने त्याला बाद केले करुन पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. गिलने 27 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 38 धावांची शानदार खेळी केली. सलामीवीर फलंदाज म्हणून गिलने गुजरातला उत्तम सुरुवात करून दिली. त्याने त्याचे काम खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केले.