Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल 2025 (IPL 2025) नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे खेळवला जात आहे. गुजरात टायटन्सला पंजाबविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्सला चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे. दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंगाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचा लाईव्ह स्कोअरकार्ड:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)