पाकिस्तानी क्रिकेटर आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा पती शोएब मलिक (Shoaib Malik) याच्या कारचा अपघात झाला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, लाहोर (Lahore) मधील राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात शोएब मलिक बचावला. मात्र त्याच्या स्पोर्ट कारचे (Sports Car) प्रचंड नुकसान झाले आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला शोएबच्या कारने जोरदार धडक दिली. हा अपघात भीषण होता. मात्र यात शोएब मलिक सुखरूप आहेत. मात्र त्याच्या स्पोर्ट्स कारचे मोठं नुकसान झाले आहे.
मिळालेल्या रिपोर्टनुसार, लाहोरमधील नॅशनल हाय परफॉरमेंस सेंटरजवळील एका रेस्टॉरंटजवळ ट्रक उभा होता. त्यामुळे शोएब मलिकच्या स्पोर्ट्स कारने या ट्रकला जोरदार धडक दिली. स्पोर्ट्स कारचा पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेबाबत शोएब मलिकने अद्याप कोणतेही वक्तव्य दिलेलं नाही.हेदेखील वाचा- वर्णद्वेषी टिपण्णीप्रकरणी उमेश यादव संतापला; अपमानास्पद कृत्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची केली मागणी
پی ایس ایل 6 ڈرافٹنگ تقریب کے بعد گھر جاتے ہوئے شعیب ملک کی اسپورٹس کار ٹرک سے ٹکراگئی، شعیب ملک بال بال بچ گئے،@realshoaibmalik @MirzaSania #PSL6 #Psl6Draft #ShoaibMalik pic.twitter.com/mUaNYfO8Re
— Usman Butt 🇵🇰 (@MeUsmanButt) January 10, 2021
पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, शोएबची स्पोर्ट्स कार वेगाने एनएचपीसीतून बाहेर पडली. ही कार वेगात असल्याने त्यावरील नियंत्रण सुटले होते. यामुळे ती घसरली आणि ट्रकला धडकली. या अपघातात ट्रकचे देखील नुकसान झाले आहे.
Pakistan cricketer Shoaib Malik's sports car met an accident outside National High Performance Centre, #Lahore after #PSLDRAFT.#ShoaibMalik #Accident pic.twitter.com/wFokvMML08
— Manzar Elahi Turk (@manzarelahi) January 10, 2021
शोएब मलिक पाकिस्तान सुपर लीगच्या प्लेयर ड्राफ्ट कार्यक्रमाहून घरी जात होता. त्यावेळी काही अंतरावरच असलेल्या नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटर जवळ हा अपघात झाला.