भारतीय क्रिकेटपटू आंतरजातीय विवाह (Photo Credit: Instagram)

प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात. मग ते धार्मिक असो, आर्थिक स्थिती असो किंवा अंतर, प्रेम अशी एक गोष्ट आहे जी दोन व्यक्तींनाच नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणते. आणि प्रेमाला मजबूत करणारे बंधन म्हणजे लग्न आहे. प्रत्येक इतर व्यक्तीप्रमाणेच, क्रिकेटपटूही प्रेमात पडतात आणि असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी धर्माची बंधनं तोडून टाकली. भारतीय संघाचा क्रिकेटपटू शिवम दुबे नुकताच लग्नबेडीत अडकला. शिवम दुबेने (Shivam Dube) शुक्रवारी (16 जुलै) गर्लफ्रेंड अंजुम खान (Anjum Khan) सोबत लग्नगाठ बांधली आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लग्नच फोटो शेअर करून चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली. मात्र धर्माची भिंत तोडून दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करणारा शिवम हा काही पहिला क्रिकेटपटू नाही आहे.

1. झहीर खान - सागरिका घाटगे

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेसोबतच्या साखरपुढ्याची घोषणा करून सर्वांना चकित केले. त्याच वर्षी दोघांनी कोर्टात लग्न केले. उल्लेखनीय आहे की झहीर मुस्लिम आहे आणि सागरिका हिंदू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaheer Khan (@zaheer_khan34)

2. मोहम्मद कैफ-पूजा यादव

नोएडास्थित पत्रकार पूजा यादव ही भारतीय संघाला 2002 नेटवेस्ट मालिका जिंकून देणाऱ्या मोहम्मद कैफची पत्नी आहे. मुस्लिम असलेल्या कैफने 2011 मध्ये पूजा यादवशी  लग्न केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohammad Kaif (@mohammadkaif87)

3. युवराज सिंह - हेजल कीच

भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंहने 2015 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले. युवी शीख असून हेजल ख्रिश्चन आहे. लग्नानंतर, हेजलने तिचे नाव बदलून गुरबसंत कौर ठेवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

4. अजित आगरकर-फातिमा घाडियाली

भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर यांनीही दुसर्‍या धर्माच्या मुलीला आपल्या जीवनाचा जोडीदार बनवले. आगरकर हिंदू असताना त्याची पत्नी फातिमा शिया मुस्लिम आहे.

5. मोहम्मद अझरुद्दीन-संगीता बिजलानी

टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचे आयुष्य खूप चढउतारांनी भरलेले आहे. 1987 मध्ये त्यांनी नौरेनशी लग्न केले, परंतु दोघांचा 1996 मध्ये घटस्फोट झाला. त्याच वर्षी अझरने बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले, पण लवकरच त्यांच्या नात्यातही दुरावा आला आणि दोघे विभक्त झाले.

6. दिनेश कार्तिक-दीपिका पल्लीकल

दिनेश कार्तिकच्या पहिल्या अपयशी विवाहानंतर त्याची भारतीय स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल शी त्याची भेट झाली आणि दोघांनी 2015 मध्ये हिंदू आणि ख्रिस्चन रीतीने लग्न केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dinesh Karthik (@dk00019)

7. मन्सूर अली खान पटौदी-शर्मिला टागोर

टीम इंडियाचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पटौदी बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोरच्या प्रेमात पडले होते. दोघे एका सामान्य मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते.दोघांमधील प्रेमाची कळी खुलल्यावर 27 डिसेंबर 1969 दोघे राजेशाही थाटात लग्नबंधनात अडकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba (@sabapataudi)

8. विनोद कांबळी-एन्ड्रिया हेविट

विनोद कांबळीने 1998 साली नोएल लुईससोबत संसार थाटला, जी ख्रिश्चन होती. मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर कांबळी आणि एन्ड्रिया हेविट एकमेकांच्या जवळ आले. एन्ड्रिया ख्रिश्चन आहे. दोघांनी 2010 मध्ये लग्न केलं. इतकंच नाही तर कांबळीने प्रेमासाठी धर्मांतरही केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vinod Kambli (@vinodkambli2016)

9. साबा करीम-रश्मी राय

मुस्लिम असलेल्या भारताचा माजी क्रिकेटपटू साबा करीम यांनी हिंदू असलेल्या रश्मी रायसोबत (Rashmi Rai) लग्न केलं.

10. हार्दिक पांड्या -नताशा स्टानकोविच

1 जानेवारी 2020 रोजी हार्दिक आणि नताशाने दुबई येथे साखरपुडा करत सर्वांना चकित केलं. मात्र दोघांनी यामध्ये आणखी भर घालत गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात लग्नाची आणि मग पहिलं मूल, मुलगा अगस्त्यच्या आगमनाची देखील घोषणा केली.

11. शिवम दुबे-अंजूम खान

टीम इंडियाचा ऑल राऊंडर शिवमने सोशल मीडियावर फोटो शेअर करत गर्लफ्रेंड अंजूम खान सोबत लागणीची माहिती दिली. दोघांनी मुस्लीम पद्धतीनं लग्न केले आणि पत्नी अंजूम खानबरोबर दुवा मागितली.

 

View this post on Instagram

 

A post shared by shivam dube (@dubeshivam)