टीम इंडियाने (Team India) गुरुवारी संध्याकाळी पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा (Zimbabwe) 10 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यजमानांनी प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गिल (Shubman Gill) या सलामीच्या जोडीने एकही विकेट न गमावता ही धावसंख्या गाठली. शुभमन गिलने 72 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 82 धावांची शानदार खेळी केली, तर धवनने 113 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने 81 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर धवनने विराट कोहलीचा मोठा विक्रम केला उद्ध्वस्त केला आहे. वास्तविक, 2019 विश्वचषकानंतर शिखर धवन वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
धवनने या कालावधीत 52.09 च्या प्रभावी सरासरीने 1094 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीच्या बॅटने 2019 च्या विश्वचषकानंतर 44.08 च्या सरासरीने 1058 धावा केल्या आहेत. या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा खूपच मागे आहे. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत 5 शतके झळकावणाऱ्या रोहितने या स्पर्धेनंतर केवळ 718 धावा केल्या आहेत. (हे देखील वाचा: Asia Cup 2022: टीम इंडियाची फिटनेस चाचणी 20 ऑगस्टला NCA मध्ये होणार, 'या' दिवशी खेळाडू दुबईला होतील रवाना, जाणून घ्या संपूर्ण माहिती)
2019 विश्वचषकानंतर सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू-
1094 - शिखर धवन (52.09 सरासरी)
1058 - विराट कोहली (44.08 सरासरी)
930 - केएल राहुल (54.70 सरासरी)
898 - श्रेयस अय्यर (42.76 सरासरी)
718 - रोहित शर्मा (44.87 सरासरी)
दुसरीकडे, या विश्वचषकानंतर जगातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास, वेस्ट इंडिजचा शे होप 1720 धावांसह अव्वल, तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 1360 धावांसह दुसऱ्या, तमीम इक्बाल 1203 धावासह तिसऱ्या स्थानावर आहे.