'शिखर धवन'चा बोर्डाच्या विद्यार्थ्यांना गुरूमंत्र, केवळ 90% मार्क्स म्हणजे यश नव्हे (Watch Video)
Shikhar Dhawan (Photo Credits: Twitter/ BCCI)

Board Exam 2019 Result:  सध्या देशभरात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तर महराष्ट्रात दहावीची परीक्षा (SSC Exam) सुरू आहे आणि बारावीची परीक्षा (HSC Exam) संपली आहे. बोर्डाच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करियरला टर्निंग पॉंईंट असतात त्यामुळे विद्यार्थ्यांवर पालकांकडूनही अधिक दबाव असतो. अपेक्षांचं ओझ सहन न झाल्याने अनेकदा विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतात. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचे टेन्शन कमी करण्यासाठी क्रिकेटर शिखर धवनने(Shikhar Dhawan) खास सल्ला दिला आहे. SSC, HSC Exam Result 2019: 12 वीचा निकाल 20 मे नंतर,10 वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात mahahsscboard.maharashtra.gov.in वर लागणार

तुमच्या यशासाठी परीक्षेतलं 'यश' किंवा 'गुण' हे मोजमाप असू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी तुम्हांला 90% मार्क्स मिळवणं गरजेचे नाही. विद्यार्थ्यांच्या पालकांनाही मुलांचं यश अपयश कशावर मोजावं? याची जाणीव असणं आवश्यक आहे. शिखर धवनने त्याच्या पालकांचे आभार मानले आहेत. माझं यश परीक्षेत किती गुण मिळाले यावर अवलंबून नाही तर क्रिकेटच्या मैदानात मी किती शतकं ठोकली आहेत? यावर अवलंबून होती.

शिखर धवनचं ट्विट

शिखर धवनने नुकत्याच पार पडलेल्या मोहाली एकदिवसीय सामन्यामध्ये शतकं ठोकलं. रोहित शर्मासोबत विक्रमी भागीदारीची कामगिरी केली. यंदाच्या आयपीएल सीझनमध्येही शिखर धवनचा धमाकेदार अंदाज पाहण्यासाठी क्रिकेट चाहते सज्ज आहेत. आयपीएलच्या बाराव्या सीझनमध्ये शिखर धवन दिल्ली संघाकडून खेळणार आहे. 23 मार्चपासून आयपीएलचं 12 वे सीझन सुरू होणार आहे.