विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या त्यांच्या करियरला टर्निंग पॉंईंट ठरणार्या असतात. महाराष्ट्रात दहावीची परीक्षा (SSC Board Exam) 1 मार्च ते 22 मार्च 2019 आणि बारावीची परीक्षा (HSC Board Exam) 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीमध्ये पार पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या निकालाचे वेध लागले आहेत. यंदा परीक्षा झाल्यानंतर राज्यात लोकसभा निवडणूक 2019(Loksabha Elections) चे पडघम वाजणार आहेत. पण दहावी, बारावीच्या शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून वगळण्यात आल्याने वेळेत निकाल लागण्याची शक्यता आहे. यंदा बारावीचा निकाल (HSC Result) 20 मे तर दहावीचा निकाल (SSC Result) जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
राज्यात तब्बल 17 लाख 813 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. ही परीक्षा 4 हजार 874परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. जुन्या अभ्यासक्रमानुसार दहावीच्या परीक्षेला बसलेल्यांना ही परीक्षा म्हणजे शेवटची संधी होती. तर, नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणारी ही पहिलीच परीक्षा असल्याने अधिकाधिक मुलांचा सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे. Open SSC Exam : दिव्यांग, कलाकार आणि खेळाडू विद्यार्थी शाळेशिवाय देऊ शकणार दहावीची परीक्षा
यंदा आरक्षणाचा कोटादेखील वाढल्याने शिक्षण मंत्रालयाकडून इन हाऊस कोट्यातून प्रवेश देण्याचं प्रमाण 10% करण्यात आलं होतं. यामुळे खुल्या गटातूनही अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया खुली होणार आहे. परीक्षेच्या काळात याबाबत चर्चा रंगल्याने अनेक विद्यार्थी तणावात होते मात्र विनोद तावडे यांनी अकरावी प्रवेशप्रकिया सुकर केली जाईल, सध्या परीक्षांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला होता.