DC vs MI WPL 2023 Live Streaming Online: शेफाली वर्मा की हरमनप्रीत कौर संघाला विजयाची हॅट्ट्रिक कोण मिळवून देणार? कुठे आणि कधी पाहणार सामना जाणून घ्या
MI vs DC (Photo Credit - Twitter)

आज महिला प्रीमियर लीगमध्ये (Women's Premier League) दोन अजिंक्य संघांमध्ये सामना रंगणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचे (DC vs MI) संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले दोन सामने जिंकले आहेत आणि आज जर एका संघाची विजयी मोहीम खंडित झाली तर दुसरा संघ विजयाची हॅटट्रिक नोंदवेल. दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून प्रेक्षकांना एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. हा सामना टीव्ही आणि मोबाईल फोनवर ऑनलाइन कसा पाहता येईल ते आम्ही तुम्हाल सांगणार आहोत. (हे देखील वाचा: Radha Yadav Catch Video: राधा यादवने दाखवली चपळता, डाइव करून पकडला आश्चर्यकारक झेल, दीप्ति शर्माही राहिली बघत, पहा व्हिडिओ)

कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह सामना

महिला प्रीमियर लीग 2023 चा 7 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. जिथे मुंबई इंडियन्सची कमान हरमनप्रीत कौरच्या हातात आहे, तिथे मेग लेलिंग दिल्लीची कमान सांभाळत असून ऑस्ट्रेलियाला 5 वेळा विश्वविजेते बनवले आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. सामन्यासाठी नाणेफेक 7 वाजता होणार आहे. महिला प्रीमियर लीगच्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स-18 1 आणि स्पोर्ट्स-18 1 एचडी चॅनेलवर होईल.

दिल्ली कॅपिटल्सचा महिला संघ

मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, मारिजन कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्स, जेस जोनासेन, तान्या भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मीनू मणी, अपर्णा मंडल, पूनम यादव, तीत साधू आणि स्नेहा दीप्ती.

मुंबई इंडियन्स महिला संघ

हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक, प्रियंका बाला, नीलम बिष्ट, सोनम बिश्त, सोनम विष्ट धारा गुर्जर, हेदर ग्रॅहम आणि क्लो ट्रायॉन.