कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा (Lockdown) कालावधी पुन्हा एकदा वाढवला आहे. आजपासून लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सरकारने कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात दारुच्या दुकानाला (Liquor Shop) परवानगी दिली आहे. यामुळे दारू खरेदी करण्यासाठी तळीरामांनी दुकानासमोर मोठी गर्दी केली आहे. यावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि भाजप पक्षाचे खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली (Delhi) येथील नागरिकांना जीवापेक्षा दारू अधिक महत्वीच झाली आहे, अशा आशायाचे गंभीर यांनी ट्विट केले आहे. गंभीर यांनी केलेल्या ट्विटला अनेकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
भारतात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगचा पालन अधिक महत्वाचे आहे. मात्र, दारु खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानाबाहेर मोठी गर्दी दिसून आली आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे दारूच्या दुकानासमोर गर्दी केल्यामुळे गौतम गंभीर यांनी दिल्लीच्या नागरिकांवर नाराज झाले आहेत. तसेच नागरिकांना स्वत:च्या जीवापेक्षा दारूचे अधिक महत्व वाटू लागले आहे, असे कॅप्शन देत त्यांनी ट्वीट केले आहे. हे देखील वाचा- जावेद मियांदाद यांनी केला खुलासा, 1978-79 पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या भारतीय फिरकीपटूंना अशा प्रकारे दिली मात
गौतम गंभीर यांचे ट्वीट-
आज दिल्ली के लिए जान से ज़्यादा जाम ज़रूरी हो गया है!! शर्मनाक नज़ारे! #DelhiDeservesBetter pic.twitter.com/a3GDYn1TDI
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 4, 2020
भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूचे 42 हजार 836 रुग्ण आढळून आले आहेत. यापैंकी 1 हजार 389 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 हजार 762 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच दिल्ली येथेही कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिल्लीत आतापर्यंत 4 हजार 549 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, 64 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 362 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.