Shahid Afridi Tests Positive: शाहीद आफ्रिदी याला कोरोनाची लागण; ट्विट करून फॅन्सना केली आपल्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती
शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Twitter/osmanuzair_pak_crik)

Shahid Afridi Coronavirus Positive: पाकिस्तानच्या (Pakistan) क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi)   याला कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याचे समजत आहे. याबाबत आफ्रिदीने स्वतःच ट्विट करून माहिती दिली आहे. आफ्रिदीने आपल्या फॅन्ससाठी एक खास मॅसेज लिहून आपल्यासाठी प्रार्थना करा अशी विनंती केली आहे. आफ्रिदीने ट्विट मध्ये म्हंटल्याप्रमाणे, मागील काही दिवसांपासून त्याची तब्येत सारखी बिघडत होती. गुरुवारी त्याला अंगदुखीचा खूपच त्रास होऊ लागला. खबरदारीचा मार्ग म्हणून त्याने कोरोनाची चाचणी केली असता आता त्याचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजत आहे. आपल्याला या आकारातून ठणठणीत होण्यासाठी तुम्हा फॅन्सच्या प्रार्थनाची गरज आहे असेही त्याने ट्विट मध्ये म्हंटले आहे. Coronavirus Updates: जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांचा आकडा 76 लाखांच्या पार तर 425,000 हून अधिक लोकांचा COVID19 मुळे बळी

शाहीद आफ्रिदी हा 40 वर्षाचा आहे, जेव्हा पासून कोरोनाचा पाकिस्तानात शिरकाव आणि प्रसार झाला आहे तेव्हापासून तो सामाजिक कामात सुद्धा हातभार लावत आहे. शाहिद आफ्रिदी फाउंडेशन च्या माध्यमातून तो हे सर्व काम करत आहे. पाकिस्तानातील अनेक भागात फिरून त्याने गरजू व गरिबांना अन्न तसेच वैद्यकीय मदत देऊ केली आहे.

शाहीद आफ्रिदी ट्विट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा खेळाडू तौफिक उमर याला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. आता उमरने या कोरोनावर मात केली आहे. या पाठोपाठ शाहीद हा दुसरा कोरोनाबाधित खेळाडू आहे.. पाकिस्तानात सध्या कोरोनामुळे बिकट परिस्थिती आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 1 लाख 32 हजार रुग्ण आढळले आहेत यापैकी 50,056 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 2,551 जननचा कोरोनामुळे बळी गेला आहे.