शाहिद आफ्रिदी याला 5व्यांदा कन्यारत्न; नेटकरी म्हणतात आता क्रिकेटची टीम बनव!
शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Twitter/osmanuzair_pak_crik)

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi)  याच्या घरी पाचव्यांदा कन्यारत्न जन्मले आहे. शाहिद आफ्रिदीची पत्नी नादियाने (Nadiya) एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आफ्रिदीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलीचा फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. ही गोड बातमी ऐकल्यानंतर शाहिद आफ्रिदीच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी त्याला आता तू काय क्रिक्रेटची टीम बनवतोस का असा सवाल केला आहे.

शाहिद आफ्रिदीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुलीचा फोटो शेअर करताना 'ईश्वराचा आशिर्वाद आणि दया माझ्यावर कायम आहे. मला ईश्वराने याअगोदर 4 गोंडस मुली दिल्या आहेत. आता आणखी एका मुलीचा जन्म झाला आहे. तुमच्या सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर करत आहे,' अशी कॅप्शन दिली आहे.

शाहिद आफ्रिदी पोस्ट

तर याच पोस्टच्या खाली, त्याच्या अनेकानीं त्याला कुटुंब नियोजनाचे धडे दिले आहेत. तर काहींनी अरे बायकोचा थोडासा विचार कर असाही खोचक सल्ला दिला आहे.काहींनी तर त्याला ट्रोल करताना सर्व सीमा ओलांडून ‘शाहीद आफ्रिदी तुला क्रिकेट टीम तयार करायची आहे का? निरक्षर कुठला!’ ‘बास्केटबॉलची टीम तर झाली आता क्रिकेटची टीम बनावयाची आहे का?’असे देखील म्हंटले आहे.

वास्तविक अशा प्रकारे ट्रोलिंगला अनेक सेलिब्रिटीना सामोरे जावे लागले आहे, सोशल मीडियावर आपल्यावर होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावासोबतच ट्रोलिंग ही आपसूकच मिळणारी भेट म्हंटली जाते. काही वेळेस यावर हे सेलिब्रिटी संतापून उत्तरे देतात तर अनेकदा शांत राहण्याचाच मार्ग रास्त मानला जातो.