शाहीन शाह आफ्रिदी (Photo Credit: Twitter)

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत रविवारी ‘महामुकाबला’ होणार आहे. दोन्ही संघ सध्या सराव सामन्यांद्वारे स्वतःच्या तयारीचे मूल्यांकन करत आहेत. दोन्ही संघ बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानकडूनही माईंड-गेम सुरू झाला आहे. दुबईत स्पर्धा खेळली जाणार असल्याने संघात फायदा होणार असा विश्वास पाकिस्तान माजी खेळाडूंनी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान संघ यूएईमध्येच आपली घरची मालिका खेळत आहे. अशा परिस्थितीत त्यांना या मैदानावरील खेळपट्ट्यांची अधिक चांगली माहिती आहे. या महान सामन्यासाठी खेळाडूंनीही कंबर कसली आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी देशातील या सामन्याचा चाहत्यांनाही स्टेडियममध्ये बसून लाईव्ह आनंद घ्यायचा आहे. चाहते या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी ते खेळाडूंकडेही विनवणीही करत आहेत. (भारत विरुद्ध पाकिस्तान T20 World Cup हाय-वोल्टेज सामन्यादिवशी सानिया मिर्झा उचलणार मोठं पाऊल, इंस्टाग्रामवर दिली माहिती)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक चाहता पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला (Shaheen Shah Afridi) भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट मागताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की चाहता आफ्रिदीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी तिकीट मागत आहे आणि नंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू खिशात हात घालून आपली असहायता व्यक्त केली. हा व्हिडिओ सराव सत्रानंतरचा आहे. जेव्हा हा वेगवान गोलंदाज स्टेडियमच्या बाहेर येत असताना एक चाहता या गोलंदाजाला गेटजवळ म्हणतो, “भारत-पाकिस्तान मॅच तिकीट है आपके पास”. यावर आफ्रिदी थांबतो आणि विनोदाने खिशात हात घालतो आणि त्याच्याकडे तिकीट नाही असा इशारा करण्याचा प्रयत्न करतो. लोकांना शाहीनची ही शैली खूप पसंत पडत आहे. एका चाहत्याने लिहिले, “शाहीनचा खिसा रिकामा आहे आणि तो भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.”

भारत आणि पाकिस्तान विश्वचषकात 1992 पासून 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारताचा वनडे सामन्यात 7-0 आणि टी-20 मध्ये 5-0 असा उल्लेखनीय विक्रम आहे. पाकिस्तान कधीच मोठ्या मंचावर भारतीय संघाला पराभूत करू शकलेला नाही. टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या मुख्य सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी त्यांचा पहिला सराव सामना जिंकला आहे. आणि आज दोन्ही संघ आपला दुसरा सराव सामना खेळणार आहेत. यांनतर त्यांचा प्लेइंग इलेव्हन निश्चित होईल.