
West Indies Women National Cricket Team vs Scotland Women National Cricket Team 2nd Match 2025 Scorecard: आयसीसी महिला विश्वचषक पात्रता 2025 चा दुसरा सामना आज वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि स्कॉटलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात लाहोरमधील लाहोर सिटी क्रिकेट असोसिएशन ग्राउंड स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात स्कॉटलंड महिला संघाने वेस्ट इंडिजचा 11 धावांनी पराभव केला. यासह, स्कॉटलंडने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. (हे देखील वाचा: Fact Check: एमएस धोनीने आयपीएलमधून केली निवृत्तीची घोषणा? व्हायरल दाव्याचे संपूर्ण सत्य येथे घ्या जाणून)
🚨 HISTORIC WIN
Scotland register a famous win despite an incredible all-round performance from Hayley Matthews.
Scotland 244 all out
West Indies 233 all out
Hayley Matthews 114* (113) & 4/56 🌟
Katherine Fraser 3/50
Chloe Abel 2/31
📸: Cricket Scotland#CricketWorldCup pic.twitter.com/96VDpn7nl5
— Women’s CricZone (@WomensCricZone) April 9, 2025
सारा ब्राइसची शानदार खेळी
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंड महिला संघाचा डाव 45 षटकांत 244 धावांवर संपुष्टात आला. स्कॉटलंडकडून यष्टीरक्षक सारा ब्राइसने सर्वाधिक धावा केल्या. मेगन मॅककॉलने 45 धावांचे योगदान दिले, तर अॅबी एटकेन ड्रमंडने 21 धावांचे योगदान दिले आणि डार्सी कार्टरने 25 धावांचे योगदान दिले. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला 50 षटकांत 245 धावा कराव्या लागल्या.
रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजचा 11 धावांनी केली पराभव
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज महिला संघ 46.2 षटकांत फक्त 233 धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार हेली मॅथ्यूजने सर्वाधिक नाबाद 114 धावा केल्या. स्कॉटलंडकडून कॅथरीन फ्रेझरने तीन विकेट्स घेतल्या. कॅथरीन फ्रेझर व्यतिरिक्त, क्लोई एबेल आणि अब्ताहा मकसूद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.