IND vs ENG 3rd Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी (IND vs ENG 3rd Test) गुरुवारपासून निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाली आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, सरफराज खानसाठी (Sarfaraz Khan) गुरुवारचा दिवस ऐतिहासिक ठरला कारण त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले. हा दिवस त्याच्यासाठी आणि त्याच्या वडिलांसाठी खास होता, ज्यांनी आपल्या मुलाने क्रिकेटर बनण्याचे अनेक वर्षे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी कठोर परिश्रम केले. गुरुवारी जेव्हा अनिल कुंबळेने सरफराजला टेस्ट कॅप दिली तेव्हा त्याच्या वडिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. दिवसाचा खेळ संपल्यानंतर सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) नसता तर कदाचित सर्फराजचे वडील आज स्टेडियममध्ये नसतात हे लक्षात आले.
सूर्यकुमार यादवमुळे पाहू शकलो मुलाचे कसोटी पदार्पण - नौशाद खान
नौशाद खान यांनी सांगितले की, सूर्यकुमार यादव जे बोलला त्यानंतर त्यांना स्टेडियममध्ये येऊन सामना पाहावासा वाटला. आपल्या मुलाचे पदार्पण पाहण्यासाठी तो आपल्या सुनेसोबत (सरफराजची पत्नी) स्टेडियममध्ये ते आले होते. ते म्हणाले, “सुरुवातीला मी न येण्याचा विचार केला होता कारण माझ्यामुळे सरफराज खानवर दबाव येवु शकतो कारण तो माझ्यावर खुप प्रेम करतो आणि त्याशिवाय मी थोडा अजारी होतो. पण सूर्यकुमारच्या मेसेजने मला येण्याची खात्री पटवून दिली.” (हे देखील वाचा: Ravindra Jadeja Apologized: सरफराज खान धावबाद झाल्याने जडेजा निराश, इंस्टाग्रामवर आपली चूक मान्य करत मागितली माफी)
'हा क्षण आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही'
सूर्यकुमार यादव त्यांना म्हणाला, “मला तुमच्या भावना समजतात आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा मी कसोटी पदार्पण केले आणि मी कसोटी कॅप घेतली तेव्हा माझे वडील आणि आई तिथेच उभे होते. आणि तो क्षण काही खास होता. हा क्षण आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जावे. “सूर्यकुमार यादवच्या या संदेशानंतर नौशाद खान स्वतःला येण्यापासून रोखू शकले नाही, आणि ते स्टेडियममध्ये पोहचले.