Ravindra Jadeja Apologized: सरफराज खान धावबाद झाल्याने जडेजा निराश, इंस्टाग्रामवर आपली चूक मान्य करत मागितली माफी
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर आपली चूक मान्य केली आणि माफीही मागितली. तो म्हणाला की, मला सरफराज बद्दल वाईट वाटत आहे.
IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये (IND vs ENG 3rd Test) खेळवला जात आहे. भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या सरफराज खानने (Sarfaraz Khan) पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली. पण जडेजाच्या (Ravindra Jadeja) चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद झाला. त्यामुळे रवींद्र जाडेजा यानं मोठ्या मनानं त्याची माफी मागितली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर आपली चूक मान्य केली आणि माफीही मागितली. तो म्हणाला की, मला सरफराज बद्दल वाईट वाटत आहे. तो चुकीचा कॉल होता. सरफराजने चांगली कामगिरी केली. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने 5 गडी गमावून 326 धावा केल्या आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 3rd Test Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून)
Ravindra Jadeja apologises to Sarfaraz Khan for the runout 🤝#INDvENG #Cricket #Jadeja pic.twitter.com/FwO2n6ExR8
— Sportskeeda (@Sportskeeda) February 15, 2024
पाहा कसा आऊट झाला सरफराज खान
Rohit Sharma furious after #SarfarazKhan run out by BJP MLA husband Ravindra Jadeja #indiancricket
— Crime Reports India (@AsianDigest) February 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2024 09:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

