IND vs ENG 3rd Test Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून

सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात 5 गडी गमावून 326 धावा केल्या आहेत. सध्या रवींद जडेजा 110 धावांवर नाबाद असून कुलदीप यादव एका धावेवर नाबाद आहे.

IND vs ENG 3rd Test Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून
Ravindra Jadeja (Photo Credit - Twitter)

 IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs ENG 3rd Test) गुरुवारपासून राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जात आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसली असून तिसऱ्या कसोटी सामन्यातही या सामन्याची अपेक्षा आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात 5 गडी गमावून 326 धावा केल्या आहेत. सध्या रवींद जडेजा 110 धावांवर नाबाद असून कुलदीप यादव एका धावेवर नाबाद आहे. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच सरफराज आणि ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्क आणि कलर सिनेप्लेक्सवर केले जाईल. या सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग Jio Cinema ॲपवर मोफत केले जाईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2024 08:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).