
क्रिकेटर्स खेळावर लक्ष केंद्रित करतात हे सुनिश्चित करण्यासाठी, अनेक क्रिकेट मंडळांनी खेळाडूंच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड्सना दौऱ्यावर येण्यास बंदी घातली आहे. काही क्रिकेटर्स या कल्पनेच्या विरोधात असतांनाही या धोरणाचे अनेक क्रिकेटपटूंनी स्वागत केले आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट ऑफ स्पिनर म्हणून ओळखले जाणारे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सक्लेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) यांनी एक रोचक कहाणी सांगितली. भूतकाळातील अनेक मनोरंजक किस्से सामायिक करणार्या सकलेनने सांगितले की 1999 क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup) स्पर्धेदरम्यान त्याने पत्नीला कपाटात कसे लपवून ठेवले होते. खेळाडूंना चकित करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) खेळाडूंना त्यांच्या पत्नींना स्पर्धेदरम्यान घरी परत पाठविण्यास सांगितले होते. 'बियोंड द फिल्ड' या कार्यक्रमात रौनक कपूरला दिलेल्या मुलाखतीत मुश्ताक यांनी तेव्हा या परिस्थितीशी कसे सामोरे गेले याचा खुलासा केला. (माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताक मुलगी बनल्यावर झाला ट्रोल, मजेदार व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट)
“डिसेंबर 1998 मध्ये माझं लग्न झालं. माझी पत्नी लंडनमध्येच राहिली होती. त्यामुळे 1999 विश्वचषकात मी माझ्या पत्नीबरोबर राहिलो आणि तेथे एक पद्धत होती- कार्यसंघासह खर्या व्यावसायिकांसारखे दिवसा कठोर परिश्रम करा आणि संध्याकाळी मी माझ्या पत्नीबरोबर वेळ घालवायचो. पण अचानक ते म्हणाले की आमच्या कुटुंबियांना घरी पाठवले जाईल. म्हणून मी आमचे मुख्य प्रशिक्षक रिचर्ड पायबस यांना सांगितले की सर्व काही सुरळीत चालू आहे की मग हे अचानक बदल का झाले. मी ठरवलं की मी याचे अनुसरण करणार नाही,” सक्लेन म्हणाले.
व्यवस्थापनातील लोक सूचनांचे पालन केले जात आहेत की नाही याकडे लक्ष ठेवण्यासाठी व्यवस्थापक प्रत्येक खेळाडूच्या खोलीत यायचे. मॅनेजर आणि एक अधिकारी त्याच्या खोलीत नियमित तपासणीसाठी आले तेव्हा सकलैनने त्याच्या पत्नीला कपाटात लपून ठेवायला सांगावे लागले. "संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक प्रत्येक खेळाडूची रूम चेक करत होते. काही खेळाडू माझ्याशी बोलण्यासाठी माझ्या रुममध्ये यायचे. एकदा कोणीतरी माझा दरवाजा वाजवला. तेव्हा मी माझ्या पत्नीला कपाटात लपण्यास सांगितले. व्यवस्थापक माझ्या रूममध्ये आले. ते इकडे तिकडे पाहिले आणि निघून गेले. माझी पत्नी त्यावेळीस कपाटातच होती. याचवेळी अझर महमूद आणि युसुफ माझ्याजवळ या नव्या नियमांशी चर्चा करण्यासाठी आले. त्यांनाही शंका आली की माझी पत्नी माझ्या खोलीतच आहे. त्यासंबंधी माझ्याशी विचारणा करू लागले. त्यानंतर मी माझ्या पत्नीला कपाटातून बाहेर येण्यास सांगितले.” 1999 वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सक्लेन मुश्ताकने पाकिस्तानकडून 49 कसोटी आणि 169 वनडे सामने खेळले आहेत. यात अनुक्रमे 208, 288 गडी बाद केले.