माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताक मुलगी बनल्यावर झाला ट्रोल, मजेदार व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट
पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक यांनी ट्विटरवर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. कोरोना व्हायरसमुळे तो घरी आहे आणि कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. यावेळी, त्याने असा व्हिडिओ पोस्ट केला आहे जो पाहून तुम्हीही लोटपोट व्हाल.
पाकिस्तानचा (Pakistan) माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) यांनी ट्विटरवर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. कोरोना व्हायरसमुळे तो घरी आहे आणि कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. यावेळी, त्याने असा व्हिडिओ पोस्ट केला आहे जो पाहून तुम्हीही लोटपोट व्हाल. या व्हिडिओमधून मुश्ताकने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना नवा मेकअप लूक दाखवून थक्क केले आहे. या ऑफ स्पिनरने जबरदस्त मेकअप केला आहे जो त्याच्या मुलीने केला. कोविड-19 (COVID-19) ने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे आणि बहुतेक प्रत्येक देशात या व्हायरसने आपले पाय पसरवले आहे. भारताचा शेजारचा देश पाकिस्तानदेखील असुरक्षित आहे. या साथीला प्रतिबंध करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे घरामध्ये राहणे आणि जास्त बाहेर जाऊ नये. पाकिस्तानचे क्रिकेटपटू आणि माजी क्रिकेटपटूही आपल्या देशवासियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टीचे अनुसरण करण्याचे आवाहन करीत आहेत. आणि सकलेन मुश्ताक यांनी लोकांना नवीन मार्गाने जागरूक करण्याचा एक मार्ग शोधला आहे. (PSL टीम इस्लामाबाद यूनाइटेडने उडवली जसप्रीत बुमराहची खिल्ली, संतापलेल्या Netizens ने दिलं जोरादार प्रत्युत्तर)
व्हिडिओमध्ये, त्याची मुलगी एक बुरखा घातलेली दिसली. सकलेन मुश्ताक ने व्हिडिओमध्ये गुलाबी रंगाचा विग आणि मेकअप परिधान केला आहे. व्हिडिओमध्ये मुश्ताक यांनी सांगितले की जबरदस्तीने आग्रह करून त्यांच्या मुलीने हा मेकअप केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले, "घरीच राहा, सुरक्षित रहा आणि या क्लिपचा आनंद घ्या." या व्हिडिओवर सकलेन मुश्ताकला ट्रोल केले जात आहे. एका यूजरने म्हटले की,"मेक-अप जरा जास्तच झाला आहे." दुसर्याने लिहिले की, "कोरोना व्हायरसने सकलेनच्या आतील स्त्री जागृत केली आहे." या व्हिडिओबद्दल त्याचे खूप कौतुक होत आहे.
Stay safe, stay at home with your loved ones and enjoy our clip ❤️ pic.twitter.com/iFPP7p6ce2
— Saqlain Mushtaq (@Saqlain_Mushtaq) April 6, 2020
भव्य साकी भाई
Stay safe, stay at home with your loved ones and enjoy our clip ❤️ pic.twitter.com/iFPP7p6ce2
— Saqlain Mushtaq (@Saqlain_Mushtaq) April 6, 2020
सुंदर आहे
She is Gorgeous 😄😄😄😄 check out The Killer Smile 😃 pic.twitter.com/RjjrnMIfp9
— 🍁 ErTuğRul KaShMiRi 🍁 (@Ertugru1Y1Sagar) April 6, 2020
क्वारंटाइनने आतील बाई जागवली
Saqlain mushtaq ki andar hi aurat ko quarantine ne jaga diya 😲
— Quarantined Sehar Shinwari (@SeharShinwari) April 6, 2020
पाकिस्तानी फलंदाज शहजाद अहमदनेही त्याचे खूप कौतुक केले आहे. त्याने लिहिले, "भाऊ तू खूप सुंदर दिसतेस." अन्य पाकिस्तानी क्रिकेटपटूने असेही लिहिले आहे की "बाप असो तर असा." सकलेन मुश्ताकची पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये गणला केली जाते आणि त्याने आपल्या संघासाठी 208 टेस्ट आणि एकदिवसीय सामन्यात 288 गडी बाद केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2020 05:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

