Sanju Samson (Photo Credit - X)

Sanju Samson breaks MS Dhoni record : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या तुफान फॉर्मध्ये असून त्याची बॅट मैदानावर आग ओकताना दिसत आहे. त्याने सलग दुसऱ्या टी-20 सामन्यात शतक झळकावत विक्रमांची रांग लावली आहे. डरबनच्या किंग्समीड मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने 107 धावांची उत्कृष्ट खेळी केली. ज्याच्या जोरावर भारताने 61 धावांनी विजय मिळवला. यादरम्यान संजू सॅमसने आपल्या विस्फोटक खेळीने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 7000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम सध्या पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे, ज्यांनी केवळ 187 डावांमध्ये हा आकडा गाठला. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेलचे नाव येते, ज्याने 192 डावांमध्ये 7000 टी-20 धावा पूर्ण करण्यात यश मिळवले. (Sri Lanka vs New Zealand 1st T20I 2024 Live Streaming: श्रीलंका-न्यूझीलंड संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने-सामने; लाइव्ह टेलिकास्ट कुठे पहाल?)

संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात केवळ 107 धावांची इनिंग खेळली नाही, तर टी-20 क्रिकेटमध्ये 7000 धावाही पूर्ण केल्या. संजूने त्याच्या 269 व्या टी-20 डावात हा आकडा गाठला आहे. यासह तो जलद 7000 धावा पूर्ण करणारा भारताचा संयुक्त सातवा खेळाडू ठरला आहे. संजूने या बाबतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक यांना मागे टाकले आहे. धोनीने 305 डावात 7000 टी-20 धावा पूर्ण केल्या होत्या.