संजय मांजरेकर यांनी निवडले आपले World Cup XI; 3 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश, रवींद्र जडेजा ला वगळले
संजय मांजरेकर (Photo Credits: Twitter)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकचा रोमांच आता संपलेला आहे. इंग्लंड (England) संघाच्या रूपात क्रिकेट विश्वाला एक नवीन विजेता मिळाला. क्रिकेट विश्वातले अनेक दिग्गज क्रिकेटपटूनीं आपले 'वर्ल्ड कप इलेव्हन निवडले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने देखील आपली विश्वकप टीम निवडली आहे. आता या यादीत नवीन नाव जुडले आहे ते माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांचे. मांजरेकर यांनी नुकतेच आपले वर्ल्ड कप इलेव्हन निवडले आणि यात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. (सचिन तेंडुलकर याने निवडले आपले World Cup XI; केन विल्यमसन कर्णधार तर एम एस धोनीला डच्चू)

मांजरेकर यांनी आपल्या वर्ल्ड कप इलेव्हन मध्ये यंदा विश्वचषकमध्ये सर्वाधिक धावा करणारे रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना स्थान दिले आहे. तर त्यांच्या सोबत सलामीची इंग्लंडच्या जेसन रॉय (Jason Roy) याची निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर बांग्लादेश चा शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आहे. शाकिबदेखील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. दुसरीकडे, चौथ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आहे. आणि केन विल्यमसन (Kane Williamson) याला त्याने आपल्या संघाचा कर्णधार बनवली आहे. पण मांजरेकरांच्या टीममध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला स्थान नाही मिळाले. जडेजाने शेवटच्या काही सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले.

ही आहे संजय मांजरेकरांनी वर्ल्ड कप टीम:

जेसन रॉय, रोहित शर्मा, शाकिब अल हसन, विराट कोहली, केन विल्यमसन (कॅप्टन), अॅलेक्स कॅरी, मिशेल सेंटनर, मिशेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, शाहीन आफ्रिदी आणि जसप्रीत बुमराह.