सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनी

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये रोमांचक सामन्यात यजमान इंग्लंड (England) संघाने न्यूझीलंडचा पराभव करत पहिल्यांदा जेतेपद मिळवले. यंदाचा विश्वचषक अनेक गोष्टींसाठी लक्षात राहण्यासारखा होता. त्यात मुख्य कारण म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याची खेळी. अफगाणिस्तान (Afghanistan), इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सामन्यांमध्ये धोनीच्या संथ फलंदाजीवर मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी टीका केली होती. आणि आता तर सचिनने विश्वचषक एक प्लेयिंग इलेव्हनचा संघ तयार केला आहे. आणि यात जगातील आघाडीचा फिनीशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला याला डच्चू देण्यात आला आहे. सचिनच्या वर्ल्डकप प्लेयिंग एलेव्हनमध्ये धोनीला स्थान नाही मिळाले. (धोनीने स्वतःहून निवृत्तीचा निर्णय घ्यावा, नाहीतर संघाबाहेर बसवू; कॅप्टन कूलला बीसीसीआय ची ताकीद)

दरम्यान, सचिनने पाच भारतीय खेळाडूंचा आपल्या प्लेयिंग एलेव्हनमध्ये समावेश केला आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 77 धावांची महत्वाची खेळी करणाऱ्या अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला स्थान मिळाले आहे. त्याशिवाय, यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma), कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) चा देखील समावेश आहे. मात्र, सचिनने किवी करणार केन विल्यमसन (Kane Williamson) याच्या हाती कॅप्टनसीची धुरा दिली आहे.

असा आहे सचिनचा संघ

रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow), केन विल्यम्सन (कर्णधार), विराट कोहली, शाकिब अल हसन (Shikb Al Hasan), बेन स्टोक्स (Ben Stokes), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मिशेल स्टार्क (Mitchell Starc), जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि जसप्रीत बुमराह.