क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) रवी शास्त्री यांना भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षकपदावर म्हणून कायम ठेवले आहे. याचबरोबर, संघाचे सहाय्यक कर्मचारी निवडण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे, जे संघाला पुढे नेण्यासाठी शास्त्री यांच्याबरोबर काम करतील. सहाय्यक कर्मचारी निवडण्याची जबाबदारी एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची ज्येष्ठ निवड समितीवर आहे. समितीने सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू केली असून गुरुवारपर्यंत ती सहाय्यक कर्मचार्यांची नावे जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (IND vs WI 2019: वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघाला मिळाली जिवे मारण्याची धमकी, BCCI दिले स्पष्टीकरण)
गोलंदाजीसाठी भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकसाठी आर श्रीधर हे प्रबळ दावेदार आहेत. तर, सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांना विक्रम राठोड (Vikram Rathour) यांच्याकडून कठोर आव्हान पेलण्याची अपेक्षा आहे. फलंदाजी प्रशिक्षकाच्या जागी बदल होण्याची शक्यता आहे. सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक बांगर यांचे जाणे निश्चित मानले जात आहे आणि याचे कारण असे मानले जाते की, बांगर चौथ्या क्रमांकावरील योग्य फलंदाज निवडण्यात अपयशी राहिले. माजी निवडकर्ते राठोड आणि माजी फलंदाज प्रवीण अमरे (Pravin Amre) यांनी फलंदाजी प्रशिक्षकासाठी अर्ज केला आहे. आणि आता या पदाची जाबाबदारी कोणाला मिळते यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, फलंदाजी प्रशिक्षकांसाठी सर्वाधिक अर्ज आले. बांगर यांनी अलीकडेच हिंदुस्तान टाईम्सला सांगितले होते की त्यांनी या पदावर कायम रहाण्यासाठी बरेच काही केले असताना त्यांच्यावर खूप दबाव होता. माजी अष्टपैलू 2014 पासून संघाचे फलंदाजी प्रशिक्षक पदावर बनून आहे. दुसरीकडे, विक्रम राठोड हे भारताचे माजी टेस्ट सलामीवीर आहेत. विक्रम राठोड 90 च्या दशकात सहा कसोटी आणि 7 एकदिवसीय सामने खेळले. अलीकडेच त्यांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) फलंदाजी प्रशिक्षकाची निवड करण्यात आली. फलंदाजी प्रशिक्षकासाठी अर्ज करणारे इतर-त्यापैकी रॉबिनसिंग, अमोल मजूमदार, हृषिकेश कानिटकर, लालचंद राजपूत, मिथुन मिन्हास आणि प्रवीण अमरे हे होते. विदेशी अर्जदारांमध्ये इंग्लंडचे माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट आणि मार्क रामप्रकाश हे होते.