लेफ्टनंट कर्नल महेंद्र सिंग धोनी ला घरी वेलकम करण्यासाठी खास गिफ्ट; पत्नी साक्षी ने शेअर केला फोटो
MS Dhoni and Sakshi Dhoni (Photo Credit: Twitter)

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) सध्या क्रिकेटमधून थोडासा दूर जाऊन सध्या भारतीय जवानांसोबत कश्मीरच्या खोर्‍यात काम करत आहे. 31 जुलै पासून कश्मीरच्या खोर्‍यात सेवेत असलेला धोनी 106 TA बटालियत सोबत काम करत आहे. धोनीची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Singh Dhoni) हीने इंस्टाग्राम वर खास फोटो शेअर केला आहे. सोबतच धोनीची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे. महेंद्र सिंह धोनी पुढील 2 महिन्यांसाठी क्रिकेटविश्वातून घेणार विश्रांती, पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल म्हणून सैनिकांसोबत घालवणार वेळ

महेंद्र सिंग धोनी हा 15 ऑगस्टपर्यंत कश्मीरच्या खोर्‍यात काम करणार आहे. साक्षीने त्यांच्या घरी आलेल्या ग्रँड चेरोकी या नव्या गाडीचा फोटो शेअर केला आहे. या कारची किंमत सुमारे 80-90 लाख आहे.

साक्षी धोनी ची पोस्ट 

धोनीचं गाडी प्रेम हे सर्वश्रृत आहे. त्याच्याकडे बाईक्स आणि कारचं खास कलेक्शन आहे. त्यामध्ये आता नव्या गाडीची भर पडली आहे. धोनीकडे फरारी 599, जीटीओ, हॅमर एच 2 जीएमसी सिएरा या गाड्या आहेत.