एमएम धोनी याच्या निवृत्तीच्या बातमीवर पत्नी साक्षी ने केले 'हे' Tweet, पहा काय म्हणाली
एम एस धोनी (Photo Credit : File Image)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या सोबतच्या एका क्षणाचा फोटो काय शेअर केला सोशल मीडियामध्ये त्याच्या निवृत्तीच्या अफवांनी जोर पकडले. धोनीच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रियांनी जणू सोशल मीडियाती पूर आणला. मात्र धोनीची पत्नी साक्षी ने एका ट्विटमध्ये क्रिकेट चाहत्यांना असे संकेत देण्याचा प्रयत्न केला की, माही या क्षणी निवृत्त होणार नाहीत आणि सोशल मीडियावर जे चालले आहे ते फक्त एक अफवा आहे. धोनीबरोबर 2016 टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यादरम्यानचा फोटो विराटने शेअर करताच, धोनी आपल्या गावी रांची येथे संध्याकाळी क्रिकेटला निरोप घेईल असे वृत्त येऊ लागले. (एमएस धोनी च्या निवृत्तीच्या बातमीवर मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी केले 'हे' मोठे विधान)

साक्षी धोनीने ट्वीट केले, "याला अफवा म्हणतात." विशेष म्हणजे, बीसीसीआयचे मुख्य निवडक एमएसके प्रसाद यांनीही दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केले की धोनीच्या निवृत्तीशी संबंधित कोणतीही माहिती त्यांच्या संज्ञानात नाही आणि सोशल मीडियामध्येही जे काही चालले आहे ती केवळ अफवा आहे.

विश्वचषकच्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर धोनीने 2 महिन्यांसाठी क्रिकेटपासून विश्रांती घेतली आहे. या दरम्यान धोनीने जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्यासमवेत 15-दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. धोनी यांना भारतीय प्रांतातील सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल म्हणून मानद उपाधी देण्यात आली आहे. तो लष्कराचा ट्रेंड पॅरा ट्रूपर देखील आहे. विश्वचषकमधील खराब कामगिरीनंतर धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी अशी मागणी चाहते आणि विशेषग्यांकडून होत होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 संघात धोनीचा समावेश नव्हता. यापूर्वी वेस्ट इंडीज दौऱ्यातदेखील संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर बीसीसीआयने निवेदन जारी करत म्हटले की स्वत: धोनीला या दौऱ्यात सामील होऊ इच्छित नाही.