2 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीच्या विधानांवर मोठे उत्तर दिले आहे. प्रसाद म्हणाले की धोनीच्या निवृत्तीबाबतचे अहवाल खोटे आहेत. टीम इंडियाच्या निवडीनंतर ते म्हणाले, "धोनीच्या निवृत्ती संदर्भात कोणतीही बातमी नाही, ही बातमी चुकीची आहे." अशी चर्चा होती की धोनी आज संध्याकाळी निवृत्तीची घोषणा करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, धोनीच्या निकटवर्ती सूत्रांनुसार धोनी सध्या अमेरिकेत आहे आणि 16 सप्टेंबर रोजी तो भारतात परतणार आहे. (एमएस धोनी आज संध्याकाळी करणार निवृत्तीची घोषणा, विराट कोहली याने शेअर केलेल्या 'या' फोटोनंतर सोशल मीडियात अफवा)
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने धोनीबद्दलचा एक फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला होता. त्यानंतर, धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरायला लागल्या. धोनीने 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यानच धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर, 2017 मध्ये, धोनीने मर्यादित षटकांच्या स्वरूपाच्या संघाचे कर्णधारपद सोडला. इंग्लंड दौर्यापूर्वी धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर विराटने संघाची धुरा आपल्या हाती घेतली.
MSK Prasad, Chief Selector: No update on MS Dhoni's retirement, the news is incorrect. pic.twitter.com/uLbzVdfmuf
— ANI (@ANI) September 12, 2019
विश्वचषकमधील खराब कामगिरीनंतर धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी अशी मागणी चाहते आणि विशेषग्यांकडून होत होती. पण, धोनीने याला तुल दिले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 संघात धोनीचा समावेश नव्हता. यापूर्वी वेस्ट इंडीज दौऱ्यातदेखील संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर बीसीसीआयने निवेदन जारी करत म्हटले की स्वत: धोनीला या दौऱ्यात सामील होऊ इच्छित नाही. टीम इंडियाच्या विंडीज दौऱ्यादरम्यान धोनी काश्मीरमध्ये भारतीय सैन्यात सेवा देत होता. या दरम्यान रिषभ पंत याला यष्टिरक्षक म्हणून संघात ठेवण्यात आले होते.