सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे निधन
Sachin Tendulkar and coach Ramakant Achrekar | (Archived and representative images)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचे गुरु रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar ) यांचे निधन झाले आहे. ते 87 वर्षांचे होते. मुंबईच्या दादर परिसरातील शिवाजी पार्क परिसरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते वृद्धापकाळातील अनेक व्यादींनी त्रस्त होते. आचरेकर यांच्या कुटुंबातील सदस्या रश्मी देवी आचरे कर यांच्या निधनाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

रश्मी देवी यांनी फोनवरुन दिलेल्या माहितीच्या आधारे पीटीआय या वृत्तसंस्थेने आचरेकर यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. क्रिकेटमधील भरीव योगदानाबद्दल आचरेकर यांना पद्म श्री आणि द्रोनचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर यांच्यासोबतच आचरेकर यांनी अनेक क्रिकेटपटू घडवले. (हेही वाचा, अभिनेते कादर खान यांचे निधन; बिग बींसह 'या' बॉलिवूड स्टार्संनी वाहिली श्रद्धांजली)

सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी, समीर दीघे, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित आणि बलविंदर सिंह सिंधू यांसारखे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आचरेकर यांच्या मुशीत तयार झाले. आचरेकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळावर एकच शोककळा पसरली आहे.