Independence Day 2019: 73 व्या स्वातंत्र्य दीनानिमित्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्याकडून चाहत्यांना खास संदेश
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty Images) आणि विराट कोहली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि टीम इंडियाची रन मशीन विराट कोहली (Virat KohlI) यांनी स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना कोहलीला वाटले की नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम केले पाहिजे. दुसरीकडे, सचिनने एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आणि चाहत्यांना बालविकासात गुंतवणूकी करण्याची विनंती केली. कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात आपले 43 वे शतक झळकावले. त्यानंतर सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत लिहिले की, “प्रत्येक भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला आपल्या देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करू आणि आपल्या स्वप्नांचा भारत तयार करूया.” (IND vs WI 3rd ODI: विराट कोहलीने श्रेयस अय्यर याला दिले विजयाचे श्रेय, स्वतःशी तुलना करत केले हे मोठे विधान)

दरम्यान, सचिनने बाळ विकास करण्याबाबतच्या गोष्टींवर भर देत लिहिले की, "“सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आम्ही गेल्या 72 वर्षात जे काही साध्य केले त्याचा अभिमान आहे. चला आपण सर्वजण लवकर बालपण विकासात गुंतवणूक करूया...हे आपले देश निरोगी, श्रीमंत आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आनंदी ठेवू शकते.”

विराट

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजमध्ये सध्या असणार्‍या टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वातंत्र्यदिनी आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ काढून घेतला. आपल्या चाहत्या क्रिकेटपटु चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत हे पाहून फारच अप्रतिम वाटले. भारताचा कर्णधार विराट कोहली याने कॅलेंडरमधील हा आतापर्यंतचा सर्वात ‘आयकॉनिक’ दिवस असलेलं म्हटले तर, केदार जाधव याने मराठीतुन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंह, गौतम गंभीरसह  महिला कुस्तीपटू गीता फोगाट आणि साक्षी मलिक यांच्यासह अन्य क्रीडापटूंनी देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराज

गौतम गंभीर

गीता फोगाट

साक्षी मलिक

वीरेंद्र सेहवाग

हरभजन सिंह

मिथाली राज