स्टिव्ह स्मिथ, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीस लक्ष्मण (Photo Credits: Instagram/ Twitter)

ख्रिसमस (Christmas) आज (25 डिसेंबर) जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या खास दिवशी जगभरातील क्रिकेटपटूंनीही त्यांच्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्यापासून, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ते ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting)  यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. सचिनने सांतासोबत एक फोटो शेअर केला आहे, तर रिकी पॉन्टिंगने आपल्या कुटुंबासमवेत ख्रिसमस साजरा करतानाचा फोटो ट्विट केला आहे. दुसरीकडे, ख्रिसमसच्या काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली याने खास पद्धतीने उत्सव साजरा केला होता. विराटने कोलकातामधील एका आश्रयगृहातील मुलांसमवेत ख्रिसमस साजरा केला होता. त्याचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने शेअर केला होता.

इथे पाहा टीम इंडिया आणि जगभरातील खेळाडूंनी कश्याप्रकारे चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी ‘शांतता आणि समृद्धी’ या शुभेच्छा दिल्या. “आनंददायी ख्रिसमस.आपल्या सणासुदीच्या हंगामात शांतता आणि समृद्धीची इच्छा”, असे त्याने लिहिले.

सांताची कॅप घालून भारताचा कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणेने लिहिले “ख्रिसमसमध्ये प्रवेश केल्याबद्दल सर्वांना खूप आनंददायी ख्रिसमसच्या शुभेच्छा! # ख्रिसमस”

श्रीलंकेचा दिग्गज सनथ जयसूर्याने सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि असे लिहिले की, “मेरी ख्रिसमसच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा… घरातील उबदारपणा, कुटुंबाचे प्रेम आणि चांगल्या मित्रांची मैत्री.”

पॉन्टिंग कुटुंबाकडून मेरी ख्रिसमस!

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादनी त्यांच्या विदेशी खेळाडूंचा ख्रिसमसच्याशुभेच्छा देतानाचा व्हिडिओ शेअर केला.

सनरायझर्स

स्टिव्ह स्मिथ

व्हीव्हीस लक्ष्मण

जसजसा हा दिवस जाईल तसतसे इतर क्रिकेटपटूही त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शुभेच्छा पोस्ट करतील. क्रिकेटच्या दृष्टीने 2019 चा शेवट जसा गोड झाला, त्याप्रमाणे वर्ष 2020 अनेक महत्त्वपूर्ण क्रिकेट स्पर्धांनी सुरू होईल. पण, उर्वरित काही दिवसांमध्ये चाहत्यांना आणखी दोन रोमांचक कसोटी सामने पाहायला मिळतील. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघ वर्ष चांगल्या नोट्सवर संपवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.