महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) 15 ऑगस्ट रोजी आपल्या अधिकृत हँडलवरून इन्स्टाग्राम पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला. यासह धोनीची यशस्वी कारकीर्द संपुष्टात आली. भारतीय संघाला 3 आयसीसी ट्रॉफी (ICC Trophies) जिंकवून देणारा धोनी एकमेव कर्णधार आहे आणि या कारणामुळे धोनीचं नाव भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये घेतलं जातं. 2007 टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) दरम्यान जेव्हा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुलीसारख्या खेळाडूंना स्पर्धेतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा भारतीय संघाचं कर्णधारपद कोणाकडे द्यायचं यावरुन बीसीसीआयमध्ये (BCCI) मोठी चर्चा सुरु होती. सचिनलाही याबद्दल विचारण्यात आलं होतं, परंतू सचिनने धोनीचं नाव पुढे करत त्याने आता जबाबदारी घ्यायला हवी असं सांगत धोनीला कर्णधारपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. 2007मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) राहुल द्रविडच्या जागी भारतीय कर्णधार शोधत असताना सचिनने धोनीच्या नावाची शिफारस केली. (MS Dhoni In T20 World Cup: शोएब अख्तरची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी, एमएस धोनीला फोन करुन टी-20 वर्ल्ड कप खेळायची विनंती करावी)
PTIला दिलेल्या मुलाखतीत सचिनने सांगितले की, "मी स्लिप कॉर्डनमध्ये उभा असायचो. आणि धोनीशी सामन्याबद्दल त्याचे विचार, क्षेत्ररक्षण कसं असावं याबद्दल आम्ही बोलायचो आणि या निष्कर्षापर्यंत पोचलो की त्याच्याकडे चांगला क्रिकेटिंग ब्रेन आहे म्हणून मी एमएसने पदभार स्वीकारावा अशी मी मंडळाला म्हटले." वीरेंद्र सेहवाग किंवा हरभजन किंवा युवराज सिंहसारख्या इतर वरिष्ठांना पदभार दिला जाईल असे अनेकांना वाटत असले तरी बीसीसीआयने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी धोनीची निवड केली. हा निर्णय मास्टरस्ट्रोक असल्याचे सिद्ध झाले आणि धोनीच्या नेतृत्वात भारताने टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपद जिंकले.
39 वर्षीय वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराने व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला. त्याच्या नेतृत्वात, 2011 आणि 2013 मध्ये इंग्लंड आणि वेल्समधील चँपियन्स ट्रॉफी, 2010 आणि 2016 आशिया चषक चॅम्पियनशिप, 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया सीबी मालिका, न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा वनडे मालिका विजय आणि घरच्या मैदानावर सर्व फॉरमॅटमध्ये वर्चस्व कायम राखले. तथापि, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनुक्रमे 2011-12 आणि 2014-15 हंगामात खराब कामगिरीनंतर त्याच्या कसोटी कर्णधारपदावर टीका करण्यात आली.