सचिन तेंडुलकर आपल्या नवीन मित्रासोबत करतोय चिल (Photo Credit: Instagram)

कोरोना व्हायरस सर्वत्र पसरला असल्यापासून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आपल्या मुंबईच्या घरातच कैद झाला आहे. माजी भारतीय सलामी फलंदाज उदारपणे दान देणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. देशातील कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव रोखण्यासाठी 47 वर्षीय सचिनने विविध मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. तेंडुलकर देखील अशी व्यक्ती आहे ज्याला निवृत्तीनंतर नवनवीन ठिकाणी भेट देण्यास आवडते. स्वयंपाक ही देखील एक गोष्ट आहे जी त्याला आवडते आणि बर्‍याचदा त्याच्या मित्र आणि कुटूंबाला स्वतःने तयार केलेले पदार्थ खायला घालतो. सचिनने लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान एका रविवारी घरीच वडापावचा बेत केला जे खाण्यासाठी एक गोंडस मांजरीच्या रूपाने ‘अनपेक्षित पाहुणा’ दिसला जो पुन्हा एकदा सचिनला भेटण्यास पोहचला. सचिनने त्या मांजरीचा फोटो पोस्ट करत लिहिलं की एक अनपेक्षित पाहुणा वडापाव खायला आला. (IPL 2020: अर्जुन तेंडुलकर ला यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघात स्थान? जाणून घ्या एका फोटोमुळे सुरू झालेल्या तर्क-वितर्कांमागील सत्य!)

"माझा नवीन मित्र परत आला आहे! गेल्या भेटीतून तो वडापाव मिस करत असल्याचे दिसत आहे," असे म्हणून सचिनने व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडिओमध्ये सचिन मांजरीबरोबर खेळताना दिसू शकतो. नंतर गेल्या आठवड्यापासून आपला 'नवीन मित्र' वडापावला मिस करत आहे असा अंदाज सचिनने व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

My new friend is back! Looks like he's missing the Vada Pav from the last visit. 😋

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

कोविड-19 लॉकडाउन सुरू झाल्यापासून सचिन स्वयंपाकात प्रयोग करीत आहे. वडा पाव व्यतिरिक्त त्याने उन्हाळ्यात एका खास पद्धतीने आंबा कुल्फी तयार केली आणि आपल्या या खास रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. जागतिक क्रिकेटमधील अनेक महान फलंदाजांद्वारे सन्मानित सचिनने 2013 मध्ये निवृत्ती घेतली. यंदा आयपीएलसाठी युएईमध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघात सचिन सामील झाला नाही, पण मुंबई इंडियन्सचा संघ तेंडुलकरविना अपूर्ण आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला अनेक वेळा मुंबई इंडियन्सच्या नेट सेशनमध्ये खेळाडूंना मदत करताना दिसला.