COVID-19 टेस्ट करतेवेळी सचिन तेंडूलकरच्या ‘या’ कृतीने डॉक्टर दचकले, पहा नक्की काय घडले (Watch Video)
सचिन तेंडुलकर COVID-19 टेस्ट (Photo Credit: Instagram)

टीम इंडियाचा महान फलंदाज आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सध्या ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ (Road Safety World Series) 2021 च्या निमित्ताने छत्तीसगडच्या रायपूर (Raipur) शहरात आहेत. इंडिया लीजेंड संघासह रायपुरात असलेल्या सचिनने मंगळवारी इंग्लंड लेजेंड्सविरुद्ध सामन्यापूर्वी कोविड-19 टेस्ट (COVID-19 Test) दरम्यान वैद्यकीय कर्मचार्‍यांची खोड काढली. तेंडूलकरने वैद्यकीय कर्मचाऱ्याची थट्टा करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मेडीआवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सचिनने आपल्या कृत्याने आणि व्हिडिओमधील भन्नाट कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधले. एक वैद्यकीय कर्मचारी सचिनच्या नाकाचे सॅप्मल जमा करत असताना वेदना होत असल्याचा आव दाखवत सचिन जोरात ओरडला. सचिनला किंचाळताना पाहून वैद्यकीय कर्मचारी देखील दचकला. पण, इतक्यात सचिनला हसू फुटले आणि तो आपली मजा घेत असल्याचे डॉक्टरांना कळाले. (Road Safety World Series 2021: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सेहवाग, सचिन आणि युवराजचा कहर, इंडिया लेजेंड्सची बांग्लादेश संघावर 10 विकेटने मात)

"मी 200 कसोटी खेळलो आणि 277 कोविड टेस्ट! मूड हलका करण्यासाठी थोडीशी खोड," त्याने इंस्टाग्राम व्हिडिओला  कॅप्शन दिले. "आम्हाला खेळण्यास मदत केल्याबद्दल येथील आमच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना कुडोस!" त्याने पुढे म्हटले. कोरोना व्हायरस महामारीमुळे मागील वर्षी रोड सेफ्टी मालिका रद्द झाल्यानंतर, यंदा 5 मार्च रोजी तिथूनच मालिकेला सुरुवात झाली. आणि इंडिया लेजेंड्सने त्यांच्या सलामीच्या सामन्यात बांग्लादेश लेजेंड्सवर 10 विकेटने मात केली. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2021 मध्ये सचिन सध्या इंडिया लीजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व करत असून त्याच्याबरोबर विरेंद्र सेहवाग, युवराज सिंह देखील इंडिया लेजेंड्स संघाचा भाग आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

दरम्यान, यंदा मालिकेच्या पहिल्या सामन्यात पहिले फलंदाजी करताना बांग्लादेश लेजेंड्स संघाला 109 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात विरेंद्र सेहवागने 35 चेंडूत नाबाद 80 धावांची तूफानी खेळी केली तर ,सचिनने 26 चेंडूत नाबाद 33 धावा करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. यापूर्वी, इंडिया लीजेंड्सने वेस्ट इंडिज आणि श्रीलंका लेजेंड्सला पराभूत केले होते. अशाप्रकारे आतापर्यंतचे 3 सामने जिंकत त्यांनी गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले आहे.